Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी सल्ला (दि ०६ ते १० जानेवारी,२०२१) : मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. मराठवाड्यात दिनांक ०७ जानेवारी, २०२१ रोजी बीड,उस्मानाबाद,लातूर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक ०६ ते ०९ जानेवारी,२०२१ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे.काढणी केलेल्या तूर पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा फुले लागणे ते घाट्या लागणे अवस्थेत असून हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी ५% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस २५%  इसी २० मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिक वाढीच्या अवस्थेत असून करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायमेथोट ३०% १३ मीली किंवा असिफेट ७५ %  १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस काढणी नंतर ऊस पिकाचे पाचट जाळू नये.नवीन लागवड केलेल्या उस पिकात पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी पिक फळ वाढीच्या अवस्थेत असून ढगाळ वातावरणामुळे संत्रा/मोसंबी बागेत  रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड @ २० ग्राम किंवा मेटालॅक्सिल + मॅनकोझेब @ १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळिंब पिक काढणी अवस्थेत असून काढणीस तयार असलेल्या डाळिंबची काढणी करून घ्यावी. चिकू पिक वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

काढणीस आलेल्या फुलाची काढणी करून घ्यावी व फुल पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला पिके

मिरची पिकात भुरी रोगाचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  मायक्लोब्युटनिल १०% डब्लूपी  १० ग्राम  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मिरची भाजीपाला पिकात  रसशोषण  करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी   पायरीप्रॉक्सीफेन १०% ईसी ४ मीली किंवा फेनप्रोपाथ्रीन १०% ईसी ४ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चारा पिक

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या चारा पिकात पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन

थंडीपासून संरक्षणासाठी कोंबड्यांना कोमट पाणी पाजावे यासाठी रात्री टाकीमध्ये साठविलेले पाणी देऊ नये,जमल्यास बोअरचे पाणी द्यावे कारण ते उष्ण असते किंवा पाणी कोमट करूनच पाण्याच्या भांड्यामध्ये टाकावे.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित तंतुमय समुध्द (२८.६४ ग्राम/१०० ग्राम) मिश्र धान्यांचे वापरासाठी तयार मिश्रण वजन कमी करण्यासाठी स्थूल व्यक्तींच्या दैनंदिन आहारात उपमा, भाकरी आणि धिरडे या स्वरुपात समाविष्ट कराव्यात.

 सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

Exit mobile version