Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला; दि. २३ ते २८ मार्च २१

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा, गहु आणि करडई या पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ही पिके काढणी केली असल्यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची  सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सध्याच्या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या द्राक्षांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्‍हणुन झाडास आधार दयावा.

भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकावरील भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनील 10 % डब्ल्यूपी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाचा अंदाज बघून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

 पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.जनावरांच्‍या गोठयाच्या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

सामुदायिक विज्ञान

मधुमेह नियंत्रणासाठी सोपे उपाय : न्याहरी, दूपारचे व संध्याकाळचे जेवण वेळेवर घ्यावेत. एखादे जेवण टाळू नये तसेच दिवसभर उपाशी राहणे टाळावे. औषधे वेळेवर व नियमीत घ्यावीत. आहारात कमी स्निग्ध पदार्थांचा समावेश असावा. आहारात तंतूमय समृध्द पदार्थांचा समावेश आवश्यक असावा. आहारात कमी सोडियमयुक्त पदार्थ असावेत. नियमीत व्यायाम करावा कमीत कमी अर्ध्या तास सकाळ व संध्याकाळी चालावे. पूरेशी झोप घ्यावी. दर तीन महिन्यानी रक्तदाब, रक्त व लघवीची नियमीत तपासणी करावी. मद्यपान आणि धुम्रपान करू नये.

 सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version