Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : २५ ते २९ नोव्हेंबर, २०२०

 मराठवाडाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून औरंगाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील जालना,बीड,परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी तर नांदेडउस्मानाबाद  व लातूर जिल्हयात दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी   तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे.

रब्बी पिके व्‍यवस्‍थापन

हरभरा पीक फांद्या लागणे अवस्थेत असून हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ % इसी २० मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ %  ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पीक वाढीच्या अवस्थेत असून करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी  डायमेथोट ३० % १३ मीली  किंवा असिफेट ७५ %  १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  लागवड केलेल्या ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पीक कंद वाढीच्या अवस्थेत असून हळद पिकात कंद माशीचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  क्विनॉलफॉस २५ % २० मीली किंवा डायमेथोएट ३० % १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी व मातीने कंद झाकून घ्यावे. (हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळद पिकात पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी पीक फळ वाढीच्या अवस्थेत असून संत्रा/मोसंबी बागेत  फळ शोषण करणाऱ्या पतंग चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी बागेत  प्रकाश सापळे लावावे. संत्रा/मोसंबी बागेत मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळ गळ होत असल्याचे दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक ५ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळिंब पीक काढणी  अवस्थेत असून काढणीस तयार असलेल्या डाळिंबची काढणी करून घ्यावी. चिकू पीक वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल शेती वाढीच्या अवस्थेत असून फुल बागेत तण नियंत्रण करून आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या फुलांची काढणी करून घ्यावे.

भाजीपाला पिके

पुनर्लागवड केलेले भाजीपाला पिक वाढीच्या अवस्थेत असून पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून  आवश्यकतेनुसार पाणी  व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावे.

चारा पिके

चारा पीक वाढीच्या अवस्थेत असून चाऱ्यासाठी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून १५ दिवस झाले असल्यास पाणी  व्यवस्थापन करावे.

पशु व्‍यवस्‍थापन

नवीन जन्मलेल्या गाय व म्हेस यांच्या वासरामध्ये विशेषतः म्हशीच्या नर वासरामध्ये टाक्सोकैरा व्हीटूलोरम या गोलकृमाची लागण होते. यासाठी जन्मलेल्या वासरास वयाच्या ७ व्या दिवशी वा त्यानंतर पायपटझीन या जंतनाशक औषधीची मात्रा देणे आवश्यक आहे. अन्यथा वासरामध्ये आवमीश्रीत दुगधरेणारी घट विष्टा टाकल्या जात व प्रसंगी मृत्यु ओढवतो.

सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक,  ग्रामीण कृषी मौसम सेवावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

Exit mobile version