दिनांक 22 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 23 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसात नांदेड व हिंगोली जिल्हयात हलक्या ते मध्यम तर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद , लातूर व परभणी जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 23 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसात नांदेड व हिंगोली जिल्हयात हलक्या ते मध्यम तर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद , लातूर व परभणी जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 जूलै ते 31 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्ष कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दूसरा हप्ता बागायतीसाठी 60 किलो नत्र प्रति हेक्टर व कोरडवाहूसाठी 36 किलो नत्र प्रति हेक्टर जमिनीत वापसा असताना द्यावा. कापूस पिकात जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामिप्रीड 20% 30 ग्रॅम किंवा थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी लागवड केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.तूर पिकात जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मूग/उडीद पिकात जमिनीत वापसा असताना तण नियंत्रणासाठी सुरूवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रणासाठी दोन कोळपण्या व एक खूरपणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.भुईमूग पिकात जमिनीत वापसा असताना तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या व एक खूरपणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.लवकर पेणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या केळी बागेत 50 ग्रॅम नत्र प्रति झाड खत मात्रा द्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. नविन लागवड केलेल्या केळी बागेतील जमिनीत वापसा असताना तणांचे नियंत्रण करावे.नविन लागवड केलेल्या आंबा बागेतील जमिनीत वापसा असताना तणांचे नियंत्रण करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी. ढगाळ वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे द्राक्ष बागेत केवडा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेत जमिनीत वापसा असताना तणांचे नियंत्रण करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये एकरी 2 किलो मेटाल्डिहाईडचे दाणे पसरून टाकावे. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
फुलशेती
फुल पिकात जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण 25 मिली + 100 मिली एवढे असावे.
सामुदासिक विज्ञान
गर्भवतीच्या आहारासंबंधी काळजी : वाढत्या गर्भाच्या आहाराची गरज भागविण्यासाठी समतोल आहार घ्यावा. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन तास अगोदर करावे. डाळी, मोड, आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या , फळे, दूध व दुधाचे पदार्थ यांचा दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. मांसाहारी गर्भवती महिला अंडी, मांस, मासे इत्यादी खाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषक आहारासोबत कॅल्शियम, लोह तथा बहू जीवनसत्वाच्या गोळ्या/ औषधी घ्याव्या.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)