Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला; ३० एप्रिल ते ५ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 30 एप्रिल ते 02 मे रोजी मराठवाडयातील सर्व  जिल्हयात  तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच दिनांक 30 एप्रिल रोजी औरंगाबाद, 01 व 02 मे रोजी बिड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 03 मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बिड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 मे रोजी नांदेड, लातुर व उस्मानाबाद  जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 मे ते 11 मे, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास  इमिडाक्लोप्रीड 17.8 % 02 मिली किंवा थायमिथोकझाम 12.6 % +  लॅम्बडा  सायहॅलोथ्रिन  9.5 % 03 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. सध्‍याच्‍या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान केळीच्या झाडांना काठीचा आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकर करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे. द्राक्षे बागेमध्ये एप्रिल छाटणी हि घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्षे बागेत एप्रिल छाटनी करून घ्यावी.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.

 भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भोपळावर्गीय भाजीपाला पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मिथाईल युजेनाल हे अमिष असलेले सापळे लावावेत तसेच सायनॅन्ट्रानिलीप्रोल 10.26 % 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास  फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

तुती रेशीम उद्योग

पुर्वी ज्या शेतामध्ये मिरची, हळद, तंबाखू किंवा भाजीपाला पिके असतील त्याशेतात जास्त प्रमाणात खत मात्रा असल्याने किंवा रासायनिक किटकनाशक/ बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारणी केली असेल अशा जमिनीची  निवड तुती लागवडीसाठी करणे टाळावे. उन्हाळयात संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मयारदित (22 ते28 सें. ग्रे.) ठेवणे शक्य झल्यास कोष उत्पादन येते पण 350 से. ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम कीटक पाने खात नाहीत.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठयाच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी, तसेच झाडाच्या आडोशाला उभे राहू नये.

 सामुदायिक विज्ञान

गर्भवतीच्या आहारासंबंधी काळजी : वाढत्या गर्भाच्या आहाराची गरज भागविण्यासाठी समतोल आहार घ्यावा. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन तास अगोदर करावे. डाळी, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व दुधाचे पदार्थ यांचा दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. मांसाहारी गर्भवती महिला अंडी, मांस, मासे इत्यादी खाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषक आहारासोबत कॅल्शियम, लोह तथा बहू जीवनसत्वाच्या गोळया/ औषधी घ्याव्या.

Exit mobile version