विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे वेचणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्राम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फल्यूबँडामाइड 20% 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकावर शेंगा माशी चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली किंवा ल्यूफेन्युरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.
जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या (वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पक्व होणाऱ्या वाणांची) तूर पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. द्राक्ष बागेत डाउनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी आमिसूलब्रोन 17.7% एससी 0.38 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ग्राम प्रति लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड 23.4% एससी 0.8 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.
भाजीपाला
जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेलया भाजीपाला पिकाची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेलया कांदा (रांगडा) पिकाची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावे. मेंढयांमध्ये यकृतकृमी व ॲम्फीसटोमस या पर्णकृमी जन्य आजारांचा प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. यामूळे प्रसंगी मेंढयांचा मृत्यू ओढवतो. सतत हगवण, गळयाखाली सूज, मलूल बनणे इत्यादी लक्षणे आढळल्यास मेंढयांची विष्ठा तपासून घ्यावी. विशेषत: ज्या मेंढया तळे, ओढा, नाला व इतर साचलेल्या पाण्याच्या काठच्या गवतावर चारल्या जातात अथवा अशा ठिकाणचे पाणी पितात त्यांच्यामध्ये हमखास लागण होते., म्हणून अशा आजाराची लागण झाल्यास मेंढयांना चरण्यासाठी इतरत्र हलवावे. अशा ठिकाणचे पाणी पिण्यास वर्ज करावे तसेच त्यांना पशूवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी देतो त्यापेक्ष वेगळया जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. मेंढयांना इतर सूश्रूषा जसे की यकृत टॉनिक्स ईत्यादी द्यावे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
शेतीतील हाताने करावयाचे खत पेरणी कार्य सुकर करण्यासाठी वनामकृवि विकसित सुलभा बॅगचा उपयोग करण्यात यावा.
(सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)