Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : ४ ते ९ सप्टेंबर २०२१

दिनांक 03 व 04 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद व जालना जिल्हयात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03  व 04 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद व जालना जिल्हयात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवसाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले पिक पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार सोयाबीन पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.  पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार खरीप ज्वारी पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार बाजरी पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार ऊस पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार हळद पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार संत्रा/मोसंबी बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार डाळींब बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार चिकू बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

 भाजीपाला

मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार भाजीपाला पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.

फुलशेती

मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार फुल पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. हिवाळी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत.

चारा पिके

मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार चारा पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर 100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी. पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.

सामुदायिक विज्ञान

कोणतेही काम करताना जास्त चालणे टाळावे. कारण चालण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण जास्त असते. यासाठी कामाच्या आराखडयाचा योग्यविचार करून कार्यस्थळाची मांडणी केल्यास कामासाठी चालण्याचे एकूण अंतर कमी करता येते.

   (सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

Exit mobile version