Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : २२ ते २६ जानेवारी २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनीतील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जानेवारी ते 01 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास ज्याठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला असेल आणि पिक फुलावर व दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल तेथे हलके पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन  पिकात चांगल्या उगवणीसाठी पेरणी नंतर पाच दिवसांनी पून्हा तूषार सिंचनाने हलके पाणी द्यावे.  ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा व सीट्रस सायलाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली  किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 % 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  काढणीस तयार असलेलया डाळींब फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकाची तोडणी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

घराला रंग देताना फिक्क्या रंगाची रंगसंगती वापरण्यावर भर द्यावा कारण पांढरा किंवा फिक्के रंग प्रकाश परावर्तित करतात व त्यामूळे खोलीचा आकार मोठा भासतो.

सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version