Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : १६ ते २० मार्च २२

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 मार्च ते 26 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.  कापणीस तयार असलेलया करडईची कापणी करावी. कापणी सकाळी करावी म्‍हणजे हातांना काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत; तसेच हातांना काटे टोचु नये म्‍हणून कपडा किंवा हातमोजे वापरावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

उन्हाळी भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून वर खताची मात्रा देऊन पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी. फुलपिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते. गाय व म्हैस या पशुधनामध्ये उन्हाळा ऋतूमध्ये माजावर येण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी केवळ चाऱ्याची कमतरता हेच एकमेव कारण नसून गोठा व्यवस्थापन देखील तेवढेच महत्वाचे आहे. गोठयाचे व्यवस्थापन असे करावे की, गोठयातील तापमानामध्ये घट होऊन तापमान आर्द्रता निर्देशांक वाढणार नाही व पर्यायी ऊर्जा संवंर्धीत होऊन गाय व म्हैस माजावर येण्याचे प्रमाण सातत्याने टिकून राहील.

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरल तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौस

Exit mobile version