प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 02 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 डिसेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 डिसेंबर ते 11 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी व सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4.5 ग्राम किंवा फल्यूबँडामाइड 39.35 एससी 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी ज्वारी पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी सूर्यफूल पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.ढगाळ वातावरणामूळे वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता करडई पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता केळी बागेत पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत. केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा. द्राक्ष बागेत जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएम ची दूसरी फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष बागेत पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता फुलपिकांची तोडणी लवकरात लवकर करून घ्यावी, फुल पिकात पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
वृध्दावस्थेत काम करण्याची क्षमता कमी झाल्यामूळे मानवी उर्जेची मागणी वाढते. त्यामूळे क्षमतेचा आवाका पाहून कामे करावीत.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी