मराठवाडयाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून किमान तापमान १६.० ते २०.० सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पिक व्यवस्थापन
पीक फांद्या लागणे अवस्थेत असून हरभरा पीकात घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे व २० पक्षी थांबे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ % इसी २० मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पीक वाढीच्या अवस्थेत असून करडई पीकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० % १३ मीली किंवा असिफेट ७५ % १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लागवड केलेल्या ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पीक कंद वाढीच्या अवस्थेत असून हळद पीकात पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात कंद माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ % २० मीली किंवा डायमेथोएट ३० % १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी व मातीने कंद झाकून घ्यावे. (हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी पीक फळ वाढीच्या अवस्थेत असून संत्रा/मोसंबी बागेत फळ शोषण करणाऱ्या पतंग चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी बागेत प्रकाश सापळे लावावे. संत्रा/मोसंबी बागेत मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळ गळ होत असल्याचे दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक ५ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळिंब पीक काढणी अवस्थेत असून काढणीस तयार असलेल्या डाळिंबची काढणी करून घ्यावी. चिकू पीक वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करावे.
फुलशेती व्यवस्थापन
फुल शेती वाढीच्या अवस्थेत असून फुल बागेला आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या फुलांची काढणी करून घ्यावे.
भाजीपाला पिके
टोमटो भाजीपाला पीकात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून आणि पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावे.
चारा पिके
चारा पीक वाढीच्या अवस्थेत असून चाऱ्यासाठी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून १५ दिवस झाले असल्यास पाणी व्यवस्थापन करावे.
पशु व्यवस्थापन
पशुधनातील संपूर्ण आर्थिक स्त्रोत प्रजनन सुलभतेवर अवलंबून असल्यामुळे कालवडी १२ महिन्यास प्रथम माजावर येणे, वघारी/पारड्या १८ महिन्यास प्रथम माज दाखवणे गायी दरवर्षी वासरू देणे, म्हशीच्या दोन सलग वेतात फारतर १४ महिने अंतर असणे आणि प्रत्येक गायी म्ह्शीकडून आयुष्यात १६ वेत मिळविणे फायद्याचे ठरते.
टीप : – सदर कृषी हवामान सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आली आहे.
सौजन्य : – डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक