Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी सल्ला : मराठवाडयात कमाल तापमानात हळूहळू होणार वाढ

  1. दिनांक 05 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
  2. दिनांक 06 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
  3. दिनांक 07 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
  4. दिनांक 08 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
  5. दिनांक 09 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 06 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पूढील काळात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात पूढील दोन आठवडे पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

पावसामूळे कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. कापूस पिकात सध्या अंतरीक बोंड सड व बाह्य बोंड सड याचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच बाह्य बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.पावसामूळे तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार पावसाची उघाड बघून स फवारणी करावी. पावसामूळे भुईमूग पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पावसामूळे केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे. ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामूळे केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पावसामूळे आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे. पावसामूळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करणऱ्या शेतकऱ्यांनी छाटणी लांबवावी.पावसामूळे सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.

भाजीपाला

पावसामूळे भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात केवडा व भूरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. काकडीवरील भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तसेच केवडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्सील + मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी

फुलशेती

पावसामूळे फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये. सध्या पशूधनामध्ये आतडयामधील सिस्टोझोमोसीस या आजाराची लागण होत आहे. रक्त विष्ठेद्वारे बाहेर पडणे अथवा रक्तयूक्त विष्ठा (शेण), भूक मंदावणे ही प्रमूख लक्षणे दिसून येतात. तळयाकाठी गोगलगायींचे वाढते प्रमाण या रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरते. म्हणून पशूधनामध्ये रक्ती हगवण आढळल्यास तळयाकाठी चरावयास अथवा त्या तळयाचे पाणी पाजण्यासाठी प्रतिबंधीत करावे तसेच पशूवैद्यक तज्ञांकडून प्राझीक्वेन्टॉल सारख्या कृमीनाशकाचा औषधोपचार करून घ्यावा.

सामुदासिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

(सौजन्‍य  :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

Exit mobile version