Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी सल्ला : मराठवाडयात तुरळक ठिकाणी वादळीवारा, पावसाची शक्यता

दिनांक 07 व 08 जूलै रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (30-40 किमी/तास) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 व 10 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 06 जूलै रोजी बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तसेच दिनांक 07 व 08 जूलै रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (30-40 किमी/तास) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 व 10 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात  ज्या तालूक्यात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मूग, उडीद, भूईमूग पिक वगळता इतर पिकांची पेरणी 15 जूलैपर्यंत करता येते. मूग, उडीद, भूईमूग पिकाची पेरणी 07 जूलै नंतर करू नये.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 11 जूलै ते 17 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी.तुर पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी.मूग/उडीद पिकाची पेरणी 07 जूलै नंतर करू नये.भूईमूग पिकाची पेरणी 07 जूलै नंतर करू नये.पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच  मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जुलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन लागवड केलेल्या  केळी बागेत तणांचे  व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या  आंबा बागेत तणांचे  व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत, शेंडा खुडावा तसेच बागेत पानांची विरळणी करावी.सिताफळ फळबागेत तणनियंत्रण करावे.

भाजीपाला

गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची लागवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर तापमान कमी होणार नाही.  भिजल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह  होण्याची शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या उद्भवणार नाही.

सामुदासिक विज्ञान

कपडयावरील हळदीचे डाग काढयासाठी : हळदीच्या डागावर ज्वारीचे पिठ टाकून बोटाने बाहेरून आत घासा. तरीही डाग आढळल्यास परत पिठ टाकून घासा. साबन किंवा धूलाई पावडरचा वापर करून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या व उन्हात वाळवा.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Exit mobile version