Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषि हवामान सल्ला; ११ ते १६ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 11 मे रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 14 व 15 मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 मे, 2021 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी 2 ते 3 ट्रायकोकार्ड 10 दिवसाच्या अंतराने 4 ते 6 वेळा वापरावे. तसेच क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 % 3 ‍मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 % ईसी 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 11, 14 व 15 मे रोजी वाऱ्याचा वेग व पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, उन्हात फवारणी करु नये. सध्‍याच्‍या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

आंबे बहार संत्रा / मोसंबी फळबागेत रसशोषन करणा-या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायमिथोएट 30 % ईसी 13 मिली किंवा इमिडाक्‍लोप्रीड 17.8 % 3 मिली प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 11, 14 व 15 मे रोजी वाऱ्याचा वेग व पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, उन्हात फवारणी करु नये. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.

आंबे बहार डाळिंब बागेत रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 % 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 11, 14 व 15 मे रोजी वाऱ्याचा वेग व पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, उन्हात फवारणी करु नये. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा.

भाजीपाला

भेंडी भाजीपाला पिकात फळे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास अळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी 5 % निंबोळी अर्क किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 % एससी 2.5 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 % ईसी 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 % ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 11, 14 व 15 मे रोजी वाऱ्याचा वेग व पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, उन्हात फवारणी करु नये. काढणीस तयार असलेल्‍या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकास आवश्‍यकतेनुसार व उपलब्‍धतेनुसार सकाळी पाणीव्‍यवस्‍थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार अयलेल्या फुलपिकांची काढणी करावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

उन्हाळा ऋतू असला तरीही अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे किटकवर्गीय माशा जसे की डास, क्यूलीकॉईडस्‍ ईत्यादीचे प्रमाण वाढले आहे व त्यांचा प्रादुर्भाव पशुधनास जाणवत आहे. म्हणून अशि शिफारस करण्यात येते की पशुधनावर 5 % निंबोळी अर्क अथवा द्रावण (15मिली निंबोळी तेल + 15 ‍मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी खूप वेळ ढवळणे) पशुधनावरती फवारावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे,  काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

सामुदायिक विज्ञान

पळसाच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 10 %, 2% आणि 4 % या प्रमाणात घेऊन वापरता येतो. पळसाच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10 % हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका पिवळा ते गडद केशरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सुर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Exit mobile version