प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात उस्मानाबाद जिल्हयात खूप हलका ते हलका ; जालना, बीड, लातूर जिल्हयात खूप हलका ते मध्यम ; औरंगाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ढगाळ वातावरणामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 5% 30 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7% 8 मिली किंवा बूप्रोफेंझीन 25% 20 मिली किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. कापूस पिकात जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% 25 ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात आकस्मिक मर विकृतीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच कोळपणी व खूरपणी करावी. लवकरात लवकर 1.5 किलो यूरीया + 1.5 किलो पालाश (पोटॅश) + 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली आळवणी करावी किंवा 1 किलो 13:00:45 + 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी. कापूस पिकात फुलगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथेलीन ॲसिटीक ॲसिड (एन ए ए ) 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी व पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी पिकात मागील आठवडयातील ढगाळ वातावरण, आर्द्रतेमूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.सध्याचे ढगाळ वातावरण, आर्द्रता, पावसामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार द्राक्ष बागेत केवडा (डाउनी मिल्डू) रोगाच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.
भाजीपाला
मागील आठवडयातील दमट, ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावीत. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार फुलपिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी फुलपिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळाऋतूमध्ये लोखंड सदृश अखाद्य वस्तू पशुधनाकडून खाद्याबरोबर गिळल्या जाते व यामूळे पोटफुगी संभवते याचे निदान करण्यासाठी पशूशल्य्चिकीत्साशास्त्र विभाग, पशू चिकीत्सालय संकुल पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय येथे अद्यावत क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध् करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
सामुदासिक विज्ञान
काम करत असताना अनुभवी व्यक्तीच्या कार्य पध्दतीचे निरीक्षण करत गेल्यास स्वत:ची कार्यपध्दती सुधारण्यास मदत होते.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी