फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी फर्जंद पासूनच सुरु झाली होती – मृण्मयी देशपांडे

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली.