करडई पिकानं दिली साथ

मी राजेश दिवाकर वाणी शेतकरी, माझी शेती महादवाडी ग्रामपंचायत गडचिरोली येथे आहे. मी आणि आसपासचे शेतकरी शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. त्यासाठी सतत नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेणे, इतर शेतकऱ्यांच्या भेटी घेणे असे उपक्रम आम्ही नेहमी घेत असतो. कोरोना काळात शासन बी-बियाणांचे मोफत वाटप करत आहे असे मला कळाले.

मग आम्ही तेल उत्पन्नासाठी करडई पीक घेण्याचं ठरविले. तेलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तेल बियांचे पीक वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासनाकडून यासाठी मोफत करडई बीयाणे दिले जाते. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे आणि पारंपरिक शेतीमध्ये बदल करून दोन पैसे कसे वाढतील यासाठी हा शासनाचा निर्णय चांगला आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतू आता शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.

मी करडई पिकाची लागवड सगुणा पद्धतीने केली. हे तंत्रज्ञान आधुनिक आहे. जास्त नांगरणी किंवा इतर खर्चाची गरज पडत नाही. 25 बाय 25 ची लागवड करून विशिष्ट पद्धतीचा वापर केला आहे. धान शेतीबरोबर नवीन पीक तसेच कमीत कमी पाणी लागणारे पीक म्हणूनही याचे महत्त्व आहे. शासनाने हा नवीन मार्ग शेतकऱ्यांना दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून 100 टक्के पीकाची हमी आहे.

हे बियाणे मोफत मिळाले. आता अधिक काळजीने या पीकाची निगा राखत आहे. लवकरच पीक निघून हातात पैसे मिळण्याची आशा आहे.

राजेश दिवाकर वाणी, जि. गडचिरोली