Video : कोरोनात नोकरी गेली, पठ्ठ्याने पोल्ट्रीत दुप्पट कमाई केली

कोरोना लॉकडाउनच्या (covid-19) काळात नोकरी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने संकटातही संधी समजून पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आता नोकरीत मिळवत असलेल्या पगारापेक्षा दुप्पट पैसा तो मिळवतोय. त्यामुळे नोकरी गेलेल्या अनेक बेरोजगार तरूणांपुढे या अभियंताने खचून न जाता मिळालेल्या संधीचं सोनं करत सगळ्यासमोर एक आदर्श ठेवलाय.

उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या सात्रा येथील सुरज शिंदे यांची ही यशकथा सर्वांना प्रेरणादायी आहे.