सध्या रासायनिक खतांचा आणि औषधीचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतोय..त्यामुळे जमिनीचा पोत हा खराब होत चाललाय…आणि त्यामुळे सकस अन्नधान्याची निर्मिती होणंही दुरापास्त आहे. जालना जिल्ह्यातल्या एका गावानं आरोग्याचं महत्व जाणलं आणि अख्खाया गावांनी सेंद्रीय शेतीची वाट धरत आपलं आरोग्य समृद्ध केलंय…आज या गावातला प्रत्येक शेतकरी सेंद्रीय शेती करून आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर होवून आरोग्य संपन्नसुद्धा झालाय.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.