Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गाळप हंगाम २०२०-२१ संदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि.9  : गाळप हंगाम सन २०२०-२१ मध्ये होणारे संभाव्य मोठ्या प्रमाणावरील गाळप हंगामात सुरू होणारे साखर कारखाने, त्यांना पूर्व हंगामी/ अल्प मुदतीची कर्ज मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

आज पुणे येथे साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्त  सौरव राव, सहकार आयुक्त अनिल कवडे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत  साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज सत्वर मिळाले पाहिजे, तर सदरहू कारखान्यांनी सादर केलेले प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते.

Exit mobile version