Video : जेव्हा पंतप्रधान लातूरच्या शेतकऱ्याशी संवाद साधतात…

लातूर जिल्ह्यातील शेतकरी बाबासाहेब नराळे यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्याशी संवाद साधताना किसान क्रेडिट कार्डांचे फायदे सांगितले. किसान क्रेडिट कार्डमुळे बँकांकडून कर्ज मिळण्यास आणि त्यामुळे शेती उत्पादन वाढविण्यात कशी मदत झाली याविषयीचा आपला अनुभव महाराष्ट्रातील लातूर येथील बाळासाहेब नरारे यांनी पंतप्रधानांना यावे यावेळी सांगितला.

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांशी बोलतांना पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील उन्नाव च्या अरविंद या शेतकरी बांधवाचे कौतुक केले. आपल्या प्रदेशातील युवा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आणि शेतीसाठी नवे तंत्रज्ञान शिकवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अंदमान-निकोबार बेटांवरील कार निकोबारचे पॅट्रीक मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती करतात, त्यांचाही पंतप्रधानांनी गौरव केला.

आंध्रप्रदेशातील अनंतपूर इथल्या एन वेणुरामा यांनी आपल्या परिसरातल्या 170 पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे, असे सांगत, त्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

मेघालयचे रँवित्झर मेघालयातील डोंगराळ भागात आले, हळद, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पिकांचे उत्पादन करतात. त्यासोबतच, पंतप्रधानांनी श्रीनगरच्या खुर्शीद अहमद यांच्याशीही संवाद साधला. अहमद, शिमला मिरची, मिरची, आणि काकडी अशा फळभाज्यांची सेंद्रिय शेती करतात.

पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील अडचणींवर मात करत अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला यांचे विक्रमी उत्पादन केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.