Live Video : मक्‍यावरील लष्‍करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रम

मराठवाडयातील औरंगाबाद व जालना जिल्‍हयात मका पिकाची मोठया प्रमाणात लागवड करण्‍यात येतेयावर लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागराष्‍ट्रीय कृषि उच्‍च्‍ा शिक्षण प्रकल्‍प (नाहेप), औरंगाबाद कृषि विभाग व नवी दिल्ली येथील साऊथ एशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मक्‍यावरील लष्‍करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० दरम्‍यान झुम अॅप व युटुब्‍यच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन पध्‍दतीने करण्‍यात आले आहे.