मराठवाडयातील औरंगाबाद व जालना जिल्हयात मका पिकाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते, यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग, राष्ट्रीय कृषि उच्च्ा शिक्षण प्रकल्प (नाहेप), औरंगाबाद कृषि विभाग व नवी दिल्ली येथील साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मक्यावरील लष्करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० दरम्यान झुम अॅप व युटुब्यच्या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे.