‘कपाशीवरील किडीचे व्यवस्थापन’
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दर शनिवारी ‘सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर’ राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेचे आयोजन करण्यात आले असुन मालिकेच्या सातव्या सत्रात दिनांक ३० ऑगस्ट रोजी ‘कपाशीवरील किडीचे व्यवस्थापन’ या विषयावर किटकशास्त्रज्ञ प्रा. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते.