सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग महाराष्ट्रासह देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी अटल वयो अभ्युदय योजना (एव्हीवायएआय) नावाची एकछत्री योजना राबवत आहे. यात खालील घटकांचा समावेश आहे, ते म्हणजे:
(i)ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रमाची योजना (आयपीएसआरसी);
(ii)ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती योजना (एसएपीएसआरसी);
(iii)राष्ट्रीय वयोश्री योजना (आरव्हीआय);
(iv) (अ) ज्येष्ठ सक्षम नागरिकांना सन्मानाने पुन्हा रोजगार मिळावा याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी उपजीविका आणि कौशल्य उपक्रम (एसएसीआरईडी ) ;
(ब ) सामाजिक पुनर्रचनेच्या उद्देशाने कृती गट (एजीआरएएसआर गट):जेष्ठ नागरिक बचत गट;
(v)जेष्ठांचा सहभाग असलेल्या रुपेरी अर्थव्यवस्थेला चालना;
(vi)वृद्धांच्या काळजीसाठी उद्योकांकडून प्राप्त होणाऱ्या सामाजिक दायित्व निधीचे योग्य प्रकारे वितरण ;
(vii) ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी जागरूकता निर्माण आणि क्षमता बांधणी योजना– प्रशिक्षण, जागरूकता, संवेदनशीलता, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइनची स्थापना.
वर्ष 2018-19, आणि 2019-2020 साठी आयपीएसआरसी, एसएपीएसआरसी आणि आरव्हीआयच्या संदर्भात निधीचे तपशील परिशिष्टात दिले आहेत.
परिशिष्ट
महाराष्ट्रासाठी 2018-19 ते 2019-20 या कालावधीत अटल वयो अभ्युदय योजना (एव्हीवायएआय) या एकछत्री योजनेअंतर्गत जारी केलेल्या निधीचा तपशील:-
(Rs. in Lakh)
Sl. No. | Scheme | F.Y. : 2018-19 | F. Y. : 2019-20 |
1 |
Integrated Programme for Senior Citizens (IPSrC)
|
833.75 | 1304.05 |
2 |
State Action Plan for Senior Citizens (SAPSrC) | – | 150.00
|
3 | Rashtriya Vayoshri Yojana | 1699.00 | 0.00
|
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.