Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महिलांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अनुदान

महिलांना चारचाकी शिकायची असते, आता तर शहर आणि ग्रामीण भागातील तरुणी चारचाकी वाहन चालवू लागल्या आहेत. मात्र अशा प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील महिलांकडे पैसे असतीलच असे नाही. म्हणून ग्रामीण भागातील महिलांना चारचाकी वाहन चालविण्यचा परवाना मिळविण्यासाठी एका योजनेअंतर्गत जिल्हा परिषद, पुणे तर्फे अनुदान दिले जाते. आपण या योजनेबद्दल आणि पुणे जिल्हा परिषदेच्या आणखी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

महिला व बालकल्याण विकास विभागाच्या योजना

1. ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळणेसाठी अनुदान. रुपये तीन हजार (3000रु) पर्यंत हे अनुदान मिळते.

2. ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे.

3. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे.

4. इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे.
(एम.एस. सीआयटी पूर्ण करणाऱ्या मुलीना हे अनुदान मिळते. प्रशिक्षणानंतर ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतात.)

समाजकल्याण विभागाच्या योजना

1. यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना (रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये).

2. पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे.

3. पीठ गिरणी पुरविणे.

4. पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे.

5. मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे.

(काही संवर्गांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे)

पशुसंवर्धन विभाग :-
1. पशुपालकांना एक सिंगल फेज २ एचपी कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदान ७५%)

2. पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान ७५%)

3. कुक्कुटपालन (एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना ५० पिल्लांचा १ गट) (अनुदान ७५%)

4. मैत्रीण योजना (महिलांसाठी) : ५ शेळ्यांचा गट (अनुदान ७५%)

कृषी विभागाच्या योजना

1. ७५ % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच.

2. ७५ % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र .

3. ७५ % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता – २० किलो)

4. ७५ % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६६ मीटर ३७० जीएसएम.)

5. ७५ % अनुदानावर सिंचनासाठी पीव्हीसी पाईप/एचडीपीई पाईप .

6. ७५ % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधे .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

1. नवीन विहिरीसाठी : रु.२,५०,०००/-

2. जुनी विहीर दुरुस्तीसाठी : रु.५०,०००/-

3. शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण रु.१,००,०००/-

4. वीज जोडणी आकार : रु.१०,०००/-

5, इनवेल बोरिंग : रु.२०,०००/-

6. सूक्ष्म ठिबक सिंचन संच : रु.५०,०००/-

7. तुषार सिंचन संच : रु.२५,०००/-

8. पंप संच : रु.२५,०००/-

वरील सर्व योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
जातीचा दाखला,
आधार कार्ड,
रहिवाशी दाखला.
उत्पन्नाचा दाखला
लाईट बील
अनुभव प्रमाणपत्र : शिवण कामासाठी
बॅँकेचे पासबुक
दोन पासपोर्ट फोटो
शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही असे हमीपत्र.

योजनांचा लाभ घेण्यासाठी संपर्क
1. आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय
2. जिल्हा परिषद कार्यालय, पुणे-1
3. आपल्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक किंवा पंचायत समिती/ जि.परिषद सदस्य

Exit mobile version