Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेचे असे आहेत फायदे

सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१४-१५ पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. त्यास अनुसरून सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अंतर्गत मका पिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत. या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारित केला आहे.

अनुदान

पात्रता

राअसुअ भात  – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)

राअसुअ गहू  – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)

राअसुअ कडधान्य  – सर्व जिल्हे

राअसुअ भरडधान्य  – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).

राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल)  – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)


आवश्यक कागदपत्रे

Exit mobile version