Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी, शेत मजुरांसाठी योजना; दोन रुपये रोज गुंतवा आणि वृद्धापकाळात निश्चिंत जगा

प्रत्येकालाच त्यांच्या निवृत्तीनंतरची चिंता असते. काही लोक त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच सेवानिवृत्ती योजनांबद्दल विचार करू लागतात, जेणेकरून त्यांना वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहावे लागू नये. मात्र जे मजुरी करतात, शेतकरी आहेत, कुठे रोजगार मिळवितात किंवा हातावरचा व्यवसाय आहे, अशा लोकांना सरकारी किंवा खासगी नोकरीतील लाभ मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेत दररोज 2 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास वर्षाला भविष्यात 36 हजार रुपये मिळू शकतात. या योजनेबद्दल जाणून घेऊया.

कोण पात्र आहेत?

१८ ते ४० वयोगटातील व्यक्ती या योजनेत सामील होऊ शकते. लाभार्थीचे मासिक उत्पन्न १५ हजार  रु. पेक्षा कमी असावे. तो EPFO ​​आणि NPS अंतर्गत येऊ नये. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक कागदपत्रे आवश्यक आहेत.

किती प्रीमियम भरावा लागेल

या प्लॅनमध्ये वयानुसार प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या १८ व्या वर्षी कोणी या योजनेत सामील झाल्यास. त्याला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतात. याचा अर्थ लाभार्थ्याला गुंतवणुकीसाठी दररोज 2 रुपयांपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील. अशा प्रकारे, ज्यांचे वय 25 वर्षे आहे त्यांना 80 रुपये आणि 40 वर्षे वय असलेल्यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. ही रक्कम वयाच्या ६० वर्षापर्यंत व्यक्तीला जमा करावी लागते.

अर्ज कसा करायचा

  1. सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या https://maandhan.in/ वेबसाइटवर जा.
  2. होम पेजवर आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. आता Self Enrollment वर क्लिक करा.
  4. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि Next वर क्लिक करा.
  5. अर्जदारांनी त्यांचे नाव, ईमेल आयडी इत्यादी तपशील प्रविष्ट करावेत.
  6. कॅप्चा कोड एंटर करा आणि मोबाईलवर मिळालेला OTP सबमिट करा.
Exit mobile version