Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

प्रधानमंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण

सरकारच्या विविध योजनांतर्गत थेट लाभ हस्तांतरण धोरणानुसार 8 कोटी ‘पीएमजेडीवाय’खातेधारकांच्या खात्यामध्ये निधी जमा

देशातल्या सामाजिक- आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. समाजातल्या दुर्बल घटकाचे आर्थिक समावेशन करणे, याला विद्यमान सरकारने राष्ट्रीय प्राधान्य दिले आहे. कारण सर्वसमावेशकता वृद्धीसाठी सक्षम करणे आणि गरीबांची बचत औपचारिकरित्या अर्थव्यवस्थेमध्ये आणणे, महत्वाचे आहे; असे सरकारला वाटते. ग्रामीण भागातल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देणे गरजेचे नाही, तर त्यांची सावकाराच्या चक्रवाढ व्याजाच्या चक्रातून सुटका करण्याची आवश्यकता आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले टाकून पीएमजेडीवाय म्हणजेच ‘प्रधान मंत्री जन धन योजना’ सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी ही जगातली सर्वात मोठी योजना आहे.

‘पीएमजेडीवाय’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 15 ऑगस्ट,2014 रोजी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये केली. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट रोजी करण्यास प्रारंभ झाला. गरीबीच्या दुष्ट चक्रातून सर्वांना मुक्त करणारी ही वित्तीय समावेशनाची योजना आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

‘पीएमजेडीवाय’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेचे महत्व विशद केले. त्या म्हणाल्या, ‘‘ पीएमजेडीवाय म्हणजे मोदी सरकारच्या जनकेंद्रीत आर्थिक उपक्रमांची पायाभरणी आहे. थेट लाभ हस्तांतरण असो अथवा कोविड-19 महामारीच्या काळामध्ये दिली जाणारी आर्थिक मदत असो, तसेच पीएम-किसान, मनरेगा अंतर्गत वेतनवृद्धी, जीवन आणि आरोग्य विमा संरक्षण या सर्व गोष्टींमध्ये पहिली पायरी म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ, प्रौढ व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. पीएमजेडीवायमुळेच हे सर्व शक्य झाले आहे.’’

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही साप्रसंगी ‘पीएमजेडीवाय’विषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ ज्यांना आत्तापर्यंत बँकप्रणालीपासून दूर रहावे लागले होते, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग प्रणालीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रवेश मिळाला. भारताच्या आर्थिक ढाचा हा एक प्रकारे विस्तार झाला. 40 कोटींपेक्षा जास्त खातेदारांना आर्थिक प्रवाहामध्ये आणण्यात आले आहे. लाभार्थींमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तसेच ग्रामीण भारतामध्ये जास्त संख्येने जन-धन योजनेतून खाती उघडण्यात आली आहेत. सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात थेट लाभ हस्तांतरणाचा किती मोठ्या प्रमाणावर फायदा सर्वांना झाला, याचा आपण सर्वांनीच अनुभव घेतला आहे. समाजातल्या आर्थिकदृष्ट्या असुरक्षित घटकांना सक्षम बनविण्यासाठी आर्थिक सुरक्षा देण्यात आली. जन धन खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण होत असल्यामुळे मदतीमध्ये होणारी गळती रोखणे शक्य झाले, लाभार्थींपर्यंत सर्व मदत पोहोचत आहे, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.

आता जन धन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला सहा वर्षे पूर्ण होत असताना, यामधल्या प्रमुख गोष्टींचा आढावा घेऊया

पीएमजेडीवाय पूर्वपीठिका
1…प्रधान मंत्री जन-धन योजना(पीएमजेडीवाय) – वित्तीय समावेशासाठीचे राष्ट्रीय अभियान सुरवातीला चार वर्षासाठी
28 ऑगस्ट 2014 ला सुरू करण्यात आले.

  1. उद्दिष्टे:
  1. योजनेची प्रमुख तत्वे
  1. प्रारंभिक वैशिष्ट्ये
    खालील सहा स्तभावर ही योजना आधारित आहे:
  1. मागील अनुभवावर आधारित पीएमजेडीवाय मध्ये महत्वाच्या दृष्टिकोनाचा स्वीकार:
  1. नव्या वैशिष्ट्यांसह पीएमजेडीवायला मुदतवाढ: समावेशक पीएमजेडीवाय कार्यक्रमाला काही सुधारणांसह 28-8- 2018 नंतरही मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  1. पीएमजेडीवाय अंतर्गत कामगिरी- ऑगस्ट 2020 रोजी
    ए )पीएमजेडीवाय खाती

पीएमजेडीवाय खाती(कोटी मध्ये)

पीएमजेडीवाय अंतर्गत खात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ
 बी ) क्रियाशील पीएमजेडीवाय खाती

सी ) पीएमजेडीवाय अंतर्गत ठेवी

डी )  पीएमजेडीवाय प्रती खाते सरासरी  जमा

ई) पीएमजेडीवाय खातेधारकांना जारी केलेली रूपे कार्ड पीएमजेडीवाय खातेधारकांना जारी केलेली रूपे कार्ड संख्या ( कोटीमध्ये )

  1. जन धन दर्शक ॲप

देशात बँक शाखा, एटीएम, बँक मित्र,टपाल कार्यालये,यासारख्या बँकिंग टच पॉइंट अर्थात   बँकेशी संबंधित सुविधा कोठे आहेत हे सांगणारा  लोक केन्द्री मंच , मोबाईल ॲप सुरु करण्यात आले आहे. जीआयएस ऐप वर 8 लाखाहून अधिक बँकिंग टच पॉइंट मॅप करण्यात आले आहेत. जनतेच्या सोयी आणि आवश्यकतेनुसार जन धन दर्शक ऐपच्या सुविधा वापरता येतात. या ॲपची वेब आवृत्ती http://findmybank.gov.in.  या लिंक वर उपलब्ध आहे.

5 किमीच्या परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणारी गावेही या ॲप द्वारे ओळखून,  इथे बँक शाखा उघडण्यासाठी  संबंधित एसएलबीसी द्वारे विविध बँकांना देण्यात येतात. या प्रयत्नामुळे बँक सुविधा नसणाऱ्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

जेडीडी ॲपच्या  5 किमी परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणाऱ्या  गावांची संख्या

  1. पीएमजेडीवाय महिला लाभार्थींसाठी प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज  (पीएमजीकेपी)

वित्त मंत्र्यांनी 26.3.2020 ला केलेल्या घोषणे नुसार पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत, प्रधान मंत्री जन धन योजना  (पीएमजेडीवाय) महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने ( एप्रिल 20 ते जून 20) या काळात दर महा 500 रुपये जमा करण्यात आले. एप्रिल  ते जून 20 या काळात पीएमजेडीवाय महिला खातेधारकांच्या खात्यात एकूण 30,705 कोटी रुपये जमा करण्यात आले.

  1. सुलभ डीबीटी व्यवहार सुनिश्चित करण्याच्या दिशेने :

विविध सरकारी योजनां अंतर्गत 8 कोटी  पीएमजेडीवाय महिला खातेधारकांना डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण लाभ मिळायची माहिती बँकांनी दिली आहे. पात्र लाभार्थींना डीबीटी वेळेवर  मिळण्याची खातरजमा करण्यासाठी, डीबीटी मिशन, एनपीसीआय, बँका आणि विविध इतर मंत्रालये यांच्याशी सल्ला मसलत करून डीबीटी विफल होण्याची आणि टाळता येणारी कारणे  शोधून काढण्यासाठी विभागाने सक्रीय भूमिका निभावली. या संदर्भात एनपीसीआय आणि  बँका यांच्या समवेत नियमित व्हीडीओ कॉन्फरन्स घेऊन बारकाईने देखरेख ठेवत टाळता येणाऱ्या कारणामुळे डीबीटी विफल होण्याचे प्रमाण घटून एप्रिल 19 मधल्या 5.23 लाख ( 0.20 % ) वरून जून 20 मध्ये 1.1 लाख (0.04 % ) झाले.

  1. पुढची वाटचाल
  1. सूक्ष्म विमा योजनेंतर्गत पीएमजेडीवाय खातेधारकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न. या दृष्टीने 10% पात्र पीएमजेडीवाय खातेधारक पीएमजेजेबीवाय तर 25 % पात्र पीएमजेडीवाय खातेधारक पीएमएसबीवाय अंतर्गत आणण्यात येतील. या उद्दिष्टाबाबत बँकांना आधीच कळवण्यात आले आहे.
  2. पीएमजेडीवाय खातेधारकांमध्ये देशभरात स्वीकृत पायाभूत ढाचा निर्माण करून त्याद्वारे रूपे सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन
  3. फ्लेक्सी आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत गुंतवणूक आणि सूक्ष्म पत पीएमजेडीवाय खातेधारकांच्या आवाक्यात येण्यासाठी अधिक प्रयत्न.

 

Exit mobile version