Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अपंगांना या योजनेअंतर्गत मिळतात दरमहा पैसे

आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील अपंग नागरिकांना दरमहा सरकार काही ठराविक वेतन देते. ही एक चांगली योजना आहे. आज आपण या योजनेबद्दल जाणून घेऊ यात. तिचे नाव आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत ती चालविली जाते.

कोण होऊ शकतात लाभार्थी:
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.

पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.

असे मिळतील फायदे:
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

अर्ज कसा करावा:
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव -जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय किंवा ऑनलाइनही अर्ज करता येईल.

Exit mobile version