शंभर टक्के अनुदान मिळणारी फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

लाभार्थी पात्रता निकष :-

  • वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे.
  • जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे.
  • जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र  आवश्यक  आहे.
  • परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

    क्षेत्र मर्यादा : 

योजनेचा लाभ कोकण विभागासाठी 0.10 हे. ते कमाल 10 हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी किमान 0.20 हे  ते कमाल 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे.

   अनुदान मर्यादा :-

लाभार्थीस  100 टक्के अनुदान देय आहे.

अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत प्रथम वर्ष 50 टक्के  दुसरे वर्ष 30 टक्के ‍ तिसरे वर्ष 20 टक्के

   लागवड कालावधी :-

 जून ते मार्च अखेर

    अर्ज कुठे करावा : –

संबंधित तालुका कृषि अधिकारी

   समाविष्ट फळपिके :-

          योजनेअंतर्गत आंबा, काजु, पेरु, चिक्कू, डाळींब,सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजिर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा, मोसंबी या 16 बहूवार्षिक फळपीकांची आवश्यकतेनुसार  कलमे /रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे.

फळपिकनिहाय अनुदान-

          

अ.क्र. फळपिक लागवड  अंतर (मी.) झाडे संख्या हेक्टरी अनुदान (रुपये )
1 आंबा  कलमे 10×10 100 57516
2 आंबा  कलमे 5×5 400 108482
3 काजू कलमे 7×7 200 60804
4 पेरू कलमे 3×2 1666 212199
5 पेरू कलमे 6×6 277 64808
6 डाळींब कलमे 4.5×3 740 114235
7 संत्रा मोसंबी,कागदी लिंबू कलमे 6×6 277 65658
8 संत्रा कलमे 6×3 555 105034
9 सिताफळ कलमे 5×5 400 75646
10 आवळा कलमे 7×7 200 54401
11 चिंच कलमे 10×10 100 50226
12 जांभूळ  कलमे 10×10 100 50226
13 कोकम  कलमे 7×7 200 51926
14 फणस  कलमे 10×10 100 46501
15 अंजिर  कलमे 4.5×3 740 99834
16 चिकू कलमे 10×10 100 55491
17 आंबा रोपे 10×10 100 53316
18 काजू रोपे 7×7 200 54804
19 कागदी लिंबू रोपे 6×6 277 60688
20 नारळ रोपे बाणावली 8×8 150 63297
  21 नारळ रोपे टी/डी 8×8 150 68697
22 सिताफळ रोपे 5×5 400 68446
23 आवळा रोपे 7×7 200 49601
24 चिंच रोपे 10×10 100 46026
25 जांभूळकलमे 10×10 100 46026
26 कोकमरोपे 7×7 200 50726
27 फणसरोपे 10×10 100 45901