Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजना

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्प मंजूर

देशातील सर्वंकष कृषी व्यवस्थेचा एक भाग म्हणून मधुमक्षिकापालनाचे महत्व लक्षात घेऊन, सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेला (2020-21 ते 2022-23 या) तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपये  मंजूर केले आहेत. आत्मनिर्भर भारत चा एक भाग म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाद्वारे (National Bee Board -NBB) राबवण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु (NBHM) योजनेद्वारे देशात “मधुर क्रांती” साधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने मधमाश्या पालनाला प्रोत्साहन देणे व या क्षेत्राचा विकास साधणे ही यामागील उद्दिष्टे आहेत.

शेती व बिगर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती, कृषी व बागायती उत्पन्नवाढ, पायाभूत सुविधा विकसित करणे यांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसायाच्या समग्र विकासाला चालना देणे हे राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

वैज्ञानिक पद्धतीने मधुमक्षिकापालन, मधुमक्षिकापालनातून स्त्री-सबलीकरण, मधमाश्यांचा शेती व बागायती उत्पादन व त्याचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने होणाऱ्या उपयोगाचे तंत्रशुद्ध स्पष्टीकरण या मधुमक्षिकापालनाबद्दल जागृती या उद्देशाने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे.

मधुमक्षिकापालन ही कृषी आधारित प्रक्रिया असून ती शेतकरी वा ग्रामीण भागातील भूमीहीन मजूरांनाही सर्वंकष शेतीचा (IFS) भाग म्हणून राबवता येईल.

Exit mobile version