ईशान्य भागात 6 मार्ग कार्यान्वित
दुर्गम प्रदेशांना जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान योजनेंतर्गत मागील 3 दिवसात 22 नवीन मार्ग कार्यरत केले गेले असून त्यापैकी 6 नवीन मार्ग ईशान्य भारतात कार्यान्वित करण्यात आले आहेत. काल शिलॉंग (मेघालय) – सिलचर (आसाम) मार्गावर यशस्वीपणे सुरू झालेल्या उड्डाणानंतर आज उडान योजनेंतर्गत शिलॉंग (मेघालय) ते अगरतला (त्रिपुरा) या पहिल्या थेट उड्डाणाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर महत्त्वपूर्ण भागधारक यावेळी उपस्थित होते. देशातील हवाई जाळे मजबूत करण्यासाठी, परवडण्याजोगे, परंतु आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि फायदेशीर हवाई प्रवास प्रादेशिक मार्गांवर करण्यासाठी उडान योजनेच्या उद्देशाने या मार्गांचे कार्यान्वयन अधोरेखित करते. उडान अंतर्गत आजमितीस 57 वापरात नसलेली आणि वापराधीन विमानतळे (5 हेलीपोर्ट्स + 2 वॉटर एरोड्रोमसह) 347 मार्गांसह भारतभरात कार्यरत आहेत.
28 मार्च 2021 रोजी उडान योजनेंतर्गत 18 नवीन मार्गाना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्य समर्थित उडान मार्ग गोरखपूर (उत्तर प्रदेश) ते लखनऊ (उत्तर प्रदेश), कुर्नूल (आंध्र प्रदेश) ते बंगळुरू (कर्नाटक), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) आणि चेन्नई (तामिळनाडू), आग्रा (उत्तर प्रदेश) ते बेंगलोर (कर्नाटक) आणि भोपाळ (मध्य प्रदेश), प्रयागराज (उत्तर प्रदेश) ते भुवनेश्वर (ओडिशा) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) हे मार्ग कार्यरत झाले. या मार्गांव्यतिरिक्त, दिब्रूगड (आसाम) ते दिमापूर (नागालँड) पर्यंत नवीन हवाई मार्ग तयार करण्यात आला.
इंडिगो एअरलाईन्सला गेल्या वर्षी उडान 4 बोली प्रक्रियेअंतर्गत शिलॉंग-अगरतळा, शिलांग – सिलचर, कुर्नूल – बेंगळुरू, विशाखापट्टणम आणि चेन्नई हे मार्ग देण्यात आले. या व्यतिरिक्त, उडान 3 अंतर्गत आग्रा ते बंगळुरू आणि आग्रा ते भोपाळ मार्ग, उडान 2 अंतर्गत प्रयागराज ते भुवनेश्वर आणि प्रयागराज ते भोपाळ मार्ग, तर दिब्रूगड ते दिमापूर हे उडान 3 लिलाव प्रक्रियेअंतर्गत मार्ग देण्यात आले. अलायन्स एअरला उडान 3 लिलाव प्रक्रियेअंतर्गत लखनऊ – गोरखपूर मार्ग देण्यात आला.