भंगारातल्या कारमधून कसे काय पैसे मिळवायचे? असा प्रश्न पडला असणार, पण हे शक्य आहे. समजा तुम्ही तुमची कार १० ते १५ वर्षे पुरेपूर वापरली असेल आणि ती इतकी खराब आहे कि कोणी ती विकतहि घेणार नाही. स्वाभाविकपणे मग ती कार भंगारात देणेच योग्य. पण या कारची तुम्हाला उत्तम मोल मिळू शकते.
केद्र सरकारच्या नव्या स्क्रॅप धोरणानुसार तुम्हाला ती भंगारात द्यायची आहे, तर तुमची कार स्क्रॅप केल्यानंतर तुम्ही नवीन कार खरेदी केल्यास तुम्हाला थेट 5% सूट मिळेल. याशिवाय नोंदणी शुल्कही आकारले जाणार नाही, म्हणजे तुमचे एक ते दीड लाख रुपये वाचतील. दरम्यान नोएडामध्ये जुन्या वाहनांचा रिसायकल करण्यासाठी युनिट सुरू केले आहे. टोयोटा आणि मारुती वाहनांसाठी हे भंगार केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यासाठी 44 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
भंगारात जुन्या गाड्या कशा विकायच्या
स्क्रॅप धोरणांतर्गत 10 ते 15 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा नियम करण्यात आला आहे. यानंतरही गाडी चालवण्यास योग्य असल्यास तिची फिटनेस चाचणी केली जाईल, सर्व गाड्यांची दरवर्षी फिटनेस चाचणी होईल आणि जी गाडी अनफिट असेल ती स्क्रॅपमध्ये जाईल.
सरकारने व्हीलर स्क्रॅप धोरणाला स्वयंसेवी वाहन आधुनिकीकरण कार्यक्रम (VVMP) असे नाव दिले आहे. जर एखाद्याची गाडी फिटनेस चाचणीत अपयशी ठरली, तर ती देशभरातील 60 ते 70 भंगार केंद्रांपैकी कोणत्याही एका केंद्रावर पाठवावी लागेल. देशातील मोठ्या शहरांमध्ये भंगार केंद्रे सुरू होतील. आणि जर तुमच्या शहरात स्क्रॅप सेंटर नसेल, तर तुम्हाला तुमची गाडी जवळच्या दुसऱ्या शहरात न्यावी लागेल.
काय असेल प्रक्रिया
त्यानंतर तुम्हाला तुमच्या कारशी संबंधित कागदपत्रे स्क्रॅपिंग सेंटरमध्ये दाखवावी लागतील, असे केल्यावर स्क्रॅप सेंटर तुमची कार क्रश करेल. तुमच्या कारचे भाग वेगळे करेल. जे भाग वापरता येतील ते ठेवतील, बाकीचे यंत्राच्या आत टाकतील आणि त्याचा लगदा बनवेल. कोणताही भाग तुम्हाला परत केला जाणार नाही, तो भंगार म्हणून ठेवला जाईल. तुम्हाला तुमची कागदपत्रे परत मिळतील. यासोबतच चेसिस नंबर प्लेटही परत मिळेल. आणि एक प्रमाणपत्र दिले जाईल (स्क्रॅप प्रमाणपत्र). ज्यामध्ये वाहनाचा तपशील लिहिला जाईल.
पुढे तुम्ही नवीन कार खरेदी करण्यासाठी तेच प्रमाणपत्र दाखवल्यावर नवीन कारच्या एक्स-शोरूम किमतीवर 5% सूट मिळेल आणि कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. ते स्क्रॅप प्रमाणपत्र जिल्ह्याच्या आरटीओकडे न्यावे लागेल, त्यानंतर तुमच्या वाहनाचे परमिट रद्द केले जाईल.