योजनेंतर्गत 2014-15 ते 28.04.2018 पर्यंत वस्ती असलेल्या परंतु वीज नसलेल्या 18,374 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले
भारत सरकारने विविध ग्रामीण विद्युतीकरण कामांसाठी डिसेंबर 2014 मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) सुरू केली होती.
राज्यांनी दिलेल्या अहवालानुसार, देशात 28 एप्रिल 2018 रोजी वीज नसलेल्या सर्व गावांचे विद्युतीकृत झाले आहे.
डीडीयूजीजेवाय अंतर्गत, 2014-15 ते 28.04.2018 पर्यंत वस्ती असलेल्या परंतु वीज नसलेल्या 18,374 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. डीडीयूजीजेवाय अंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 1,27,68,620 वीज सेवा जोडणी प्रदान करण्यात आली.
केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.