कृषी हवामान सल्ला; १६ ते २१ एप्रिल २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1.0 ते 2.0  अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 एप्रिल, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी  व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास  इमिडाक्लोप्रीड 17.8 % 02 मिली किंवा थायमिथोकझाम 12.6 % +  लॅम्बडा  सायहॅलोथ्रिन  9.5 % 03 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी दुपारच्या वेळी करू नये.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.केळी बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.   द्राक्षे बागेमध्ये एप्रिल छाटणी हि घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्षे बागेत एप्रिल छाटनी करून घ्यावी.

सीताफळ बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.

भाजीपाला पिके

भाजीपाला पिकाला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.  भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी     पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकाला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

पट्टा पध्दत तुती लागवडीत आच्छादन, ठिबक सिंचन व यांत्रीकीकरण सोइचे जाते. याउलट सरी पध्दत तुती लागवडीत झाडांची प्रति हेक्टर संख्या कमी बसते. पट्टा पध्दतीमध्ये एकरी 10 गुंठे क्षेत्रालाच उन्हाळयात पाणी द्यावे लागते. 1.5 एकर इंच एक वेळा तुती बागेस प्रति एकर म्हणजे अंदाजे 1 लक्ष 50 हजार लीटर पाणी एकवेळा लागते. वर्षाकाठी 45 लक्ष लिटर पाणी एकरी द्यावे लागते.  ठिबक सिंचन केल्यास 44 % बचत होते म्हणजे 25 लक्ष लिटर मध्ये पाणी पुरेसे होते आणि पट्टा पध्दतीमध्ये आच्छादन केल्यास बऱ्यापैकी पाण्याची बचत होते व निंदनीच्या खर्चात बचत होते.

 सामुदायिक विज्ञान

हिरव्या रंगाच्या भाज्या व फळे जसे ब्रोकली, काकडी, सिमला मिरची, वटाणे, पत्ताकोबी, वाल, शेवगा, आणि गवारीच्या शेगा ही प्रतिकारशक्ती वाढवितात.केसरी रंगाच्या भाज्या व फळे जसे संत्री, गाजर, पपई, रताळे व भोपळा यांचा आहारात समावेश केल्यामूळे कर्करोग टाळण्यास मदत होते.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)