मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 7 व 8 मार्च रोजी आकाश ढगाळ राहून दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

काढणीस तयार असलेल्या हरभरा व ज्वारी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असून जमिनीतील ओलावा वाढला असल्याचे दिसून येत आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 9 ते 15 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.