पिकातील तण व्यवस्थापन प्रभावीपणे कसे कराल

सुचना : कृषी तज्ञांचा सल्‍ला घेऊनच तणनाशकांचा वापर करावा.

पिकात वाढणारी तणे

अ. एकदलवर्गीय : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचु, चिमनचारा इ.

ब.  व्दिदलवर्गीय : दिपमाळा, दुधी, माठ, काटेमाठ, कुंजरु, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, माका, उंदीरकाणी, शेवरा, रान एरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथरी, चांदवेल, चंदनबटवा, खांडाखुळी इ.

तणामुळे हेाणारे नुकसान

  1. पिकालाअन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते
  2. कीडआणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो
  3. कालवेचा-याची वाहक क्षमता घटते.
  4. उत्पादनातघट येते.
  5. शेतीउत्पादनांची प्रत खालावते.

पिकातील तणांचा बंदोबस्त

  1. तणांचाप्रादुर्भाव कमी होण्यासाठी

(अ) ओलितांचे दांड नेहमी तणविरहीत ठेवावे.

(ब) शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढु देऊ नये.

(क) शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक घ्यावे.

(ड) मजुरांची कमतरता भासल्यास तणनाशकाचा वापर तक्ता क्रं. 1 प्रमाणे करावा.

(इ) तणनाशकाची फवारणी फुट स्प्रेअर अथवा नेंपसॅक पंपाने करावी. त्यासाठी फ्लॅटफॅन अथवा फ्लडजेट नोझल वापरावे.

(फ) तणनाशकाची फवारणी केलेला पंप साबणाच्या पाण्याने 2 ते 3 वेळा धुवावा व नंतरच किटनाशके फवारणी करीता वापरावे.

 

विविध पिकातील तणांचे नियंत्रण

ज्वारीबाजरी : पेरणीनंतर 2 निंदण्या व 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी अॅट्रॅझीन 0.75 कि/हे. या प्रमाणात फवारावे.

ओलिताखाली पेरसाळ : पेरणीनंतर दोन निंदण्या व दोन कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी पेन्डीमिथॅलिन 2.0 कि./हे या प्रमाणात फवारावे.

तुर : पेरणीनंतर तणांच्या प्रादुर्भावप्रमाणे तीन निंदण्या आणि कोळपण्या 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी मेटोलॅक्लोर 1.0 कि/हे. या प्रमाणात फवारावे.

सुर्यफुल : पेरणीनंतर तीन निंदण्या आणि तीन कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी 0.10 कि./हे. ऑक्सीक्लोरफेन ची फवारणी करुन नंतर 6 आठवडयांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

कपाशी : पेरणीनंतर तिन निंदण्या व कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात. किंवा पीक उगवणीपुर्वी पेन्डीमिथॅलीन 1.00 कि./हे. या प्रमाणात फवारणी करावी नंतर 6 आडवडयांनी एक कोळपणी व खुरपणी करावी.

ऊस : सुरु उसाला 3, पुर्वहंगामी ऊसाला 4 व आडसाली उसाला 4 ते 5 निंदण्या एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात.

हळद : हळद पीकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी व अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक उगवणीपुर्वी मेट्रीब्‍यूझीन 70 टक्के डब्‍ल्‍यु. पी. 0.7 कि. क्रियाशील घटक प्रती हेक्‍टरी, लागवडीनंतर 9 आठवडयांनी काडाचे आच्‍छादन 10 टन प्रति हेक्‍टरी व 12 आठवडयांनी एक खुपरणी करावी. किंवा चार निंदण्या 3, 6, 9 व 12 आठवडयांनी द्याव्यात किंवा अॅट्राझीन 0.75 कि. /हे किंवा ऑक्सीक्लोरफेन 0.15 कि./हे ची उगवणीपुर्वी फवारणी करुन नंतर 9 व 12 आठवडयांनी फवारणी करावी.

घातुक तणांचा बंदोबस्त

हराळीनागरमोथाकुंधा

– उन्हाळी हंगामात जमीन नांगरुन, वखरुन वर आलेल्या गाठी, काशा वेचुन जाळुन टाकाव्यात.

या तणाच्या नियंत्रणासाठी ही तणे कोवळी असताना (2 ते 4 पाने असताना) ग्लायफॉसेट हे तणनाशक हेक्टरी 2.05 कि. या प्रमाणात फवारावे. हे तणनाशक बाजारात ग्लायसेल, राऊंडअप, विडॉफ इ. नावाने मिळते. फवारावीनंतर दोन तास पाऊस पडणार नाही याचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. फवारणीनंतर 3 ते 4 आठवडे अशा जमिनीत कसलीही मशागत करु नये.

गाजरगवत

गाजर गवताच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

(1) प्रतिबंधात्मक (2) निवारणात्मक (3) निर्मुलनात्मक

(1) प्रतिबंधात्मक : हे तण फुलावर येण्यापुर्वी मुळासकट उपटुन काढावे. कंपोस्टचे खडडे, ओलिताचे दांड, कालवे, रेल्वेलाईन, रस्ते इत्यादी ठिकाणी गाजरगवत फुलावर येण्यापुर्वी उपटावे.

(2) निवारणात्मक : उभ्या पिकातील गाजरगवत निंदणी अगर कोळपणीव्दारे मुळासकट काढावे. निरनिराळया पिकांत तणांचे नियंत्रणासाठी तणनाशकाच्या शिफारशी केलेल्या आहेत.  त्यांचा अवलंब केल्यास पिकात गाजर गवत उगवत नाही.

पडीत जमिनीत उगवणा-या गाजर गवतासाठी 2, 4  डी हे तणनाशक (सोडियम क्षार) 3 किलो किंवा ग्लायफोसेट 5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळुन हे तण फुलावर येण्यापुर्वी फवारावे. गरज भासल्यासपरत 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणात फवारणी करावी. 2, 4 – डी उपलब्ध नसल्यास खाण्याचे मीठ 20 किलो 100 लिटर पाण्यात मिसळुन फुलावर येण्यापुर्वीच त्यावर फवारावे. किंवा पीक विरहीत क्षेत्रावर तरोटा बियाणे (15 ग्रॅम तरोटा बियाणे प्रति चौरस मिटर) वापरले असता गाजरगवताची संख्या व त्याचे शुष्क वजन परिणामकारकरित्या घटु शकते. त्यामुळे अशा क्षेत्रावर चार ते पाच वर्षानंतर गाजरगवताचा बंदोबस्त परिणामकरकरित्या होतो.

(3) निर्मुलनात्मक : गाजर गवत एकाच वेळी सर्व संबंधितानी आणि संस्थानी सामुहिकरित्या फुलावर येण्यापुर्वीच वारंवार काढुन टाकावे.

गाजर गवताच्या निर्मुलनासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर

झायगोग्रामा बायकोलरॅटा भुंग्याचा जीवनक्रम : या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असुन त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजुवर अंडी घालतात. अंडयांचा रंग फिकट असुन अंडयातुन अळया बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असुन अंडयातुन बाहेर निघालेल्या अळया गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. तरुण अळया झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असुन पुर्ण वाढलेल्या अळया रंगाने पिवळया पडतात. अळी अवस्था 10 ते 11 दिवसांची असते, कोषावस्था 9 – 10 दिवसांनी असुन कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतुन निघुन गाजर गवताच्या पानावर उपजिवीका करतात. पावसाळयात जुन ते ऑक्टोंबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडुन बसतात आणि पुढील वर्षी पावसाळाच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतुन निघुन गाजरगवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखादया ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे व किती सोडावेत : शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्यप्राण्याचा अडथळा / शिरकाव नाही, अशा जागी भुंगे सोडण्यास योग्य. प्रभावी नियंत्रण रेल्वे व राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने पडिक जमिनीत, बसस्थानका जवळीत मोकळया जागेत त्वरीत मिळते.

नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे : भरपुर भुंगे असलेल्या गवतावरील 500 – 1000 भुंगे 10 – 15 सें.मी. उंच प्लॅस्टीकच्या बाटलीत टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खादय म्हणुन टाकावा.

भुंग्याचा इतर पिकाना उपद्रव : जैविक किड नियंत्रण संचालनालय बेंगलोरच्या चाचणी नुसार इतर पिकांना सुरक्षित आहेत. भुंगे व अळया फक्त गाजरगवतच खातात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमीनीत सुप्तावस्थेत जातात.

भुंग्याचा मानवाला त्रास : झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणीमात्राला त्रास नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे.

भुंग्याचे प्रयोगशाळेत अथवा शेतावर गुणन : प्रयोगशाळेत प्‍लॅस्टीकच्या 6 x 9 इंच आकाराच्या डब्यात. शेतात 10 x 10 फुट अथवा 10 x 15 फुट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याने गुणन करतात.

तक्ता 1 : महत्वाच्या पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन

पीक तणनाशक हेक्टरी मात्रा (कि./लि.) पाण्याचे प्रमाण (लि./हे.) फवारा करण्याची वेळ फवारणी नंतर निंदणी व कोळपणीची वेळ (आठवडे) आवश्यक काळजी
सलग पीके
ज्वारी ॲट्रॅझीन एक किलो एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी सहा तुरीसारखे आंतरपीके घेऊ नये
बाजरी ॲट्रॅझीन दिड किलो एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी गरज नाही मजुर उपलब्ध नसल्यास
मका ॲट्रॅझीन एक किलो एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी सहा हलक्या जमीनीत मध्यम ते भारी जमीनीत
पेरसाळ

(ओलीत)

पेन्डीमिथॅलीन

ब्युटॅक्लोर

दोन किलो

तीन किलो

एक हजार

एक हजार

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

सहा

सहा

जमीन भुसभुशीत व ओलसर असावी
गहु ऑक्सीफलुओराफेन

2-4 डी

425मि.ली

एक किलो

एक हजार

500मिली

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

पेरणीनंतर

सहा

25-30 दिवसानी

पाणी माती मिश्रीत गढुळ असु नये

जमिनीतवरील फवा-यासाठी नॅपसॅक किंवा फुटपंप वापरावा

कपाशी पेन्डीमिथॅलीन

डायुरॉन

अडीच कि.

625 ग्रॅम

एक हजार

एक हजार

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

सहा

सहा

कारमेक्‍स किंवा क्लास देशी कापसातील तणांच्या नियंत्रणासाठी वापरु नये
उडीद ऑक्सीफलुओरफेन 425मि.ली. एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी सहा जमिनीवरील फवा-यासाठी फुटपंप अथवा नॅपसॅक पंप वापरावा
तुर मेटोलॅक्लोर 2 लि. एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी सहा जमिनीवरील फवा-यासाठी फुटपंप अथवा नॅपसॅक पंप वापरावा
सुर्यफुल ऑक्सीफलुओरफेन 425मि.ली. एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी पाच जमिनीवरील फवा-यासाठी फुटपंप अथवा नॅपसॅक पंप वापरावा
हरभरा पेन्डीमिथॅलीन अडीच लि एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी सहा नोजल / डब्ल्युएफएन-40 क्रमांकाचे
भुईमुग पेन्डीमिथॅलीन अडीच लि एक हजार पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी पाच नोजल / डब्ल्युएफएन-40 क्रमांकाचे
ऊस ॲट्रॅझीन

मेट्रीबुझीन

दोन लि.

एक किलो

एक हजार

एक हजार

लागवणीनंतर वापसा येताच

लागवणीनंतर वापसा येताच

आठ

सहा

नोजल / डब्ल्युएफएन-40 क्रमांकाचे
सोयाबीन अलॅक्लोर

पेंडीमिथॅलीन

चार लि.

दोन लि.

एक हजार

एक हजार

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

सहा

सहा

नोजल / डब्ल्युएफएन-40 क्रमांकाचे
हळद ॲट्राझीन

ऑक्सीफलुओरफेन

मेट्रीब्‍युझीन

दीड लि.

640मि.ली

700 ग्रॅम

एक हजार

एक हजार

एक हजार

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी

लागवडीनंतर पंरतु उगवणीपुर्व

9 व 12

9 व 12

12

नोजल / डब्ल्युएफएन-40 क्रमांकाचे
भाजीपाला पिके
कांदा ऑक्सीफलोरफेन 425मि.ली एक हजार लावणी अधी 2-3 दिवस किंवा लावणी नंतर 2-3 दिवसात सहा ओलसर जमिनीवर फवारावे
भेंडी पेन्डीमिथॉलीन अडीच लि. एक हजार उगवणीपुर्वी सहा फवारतांना जमिन ओलसर असावी
मिरची ऑक्सीफलोरफेन 225 लि. 1 हजार लावणी नंतर सहा ओलसर जमिनीवर फवारावे
पेन्डीमिथॉलीन अडीच लि. 1 हजार लावणी अगोदर सहा ओलसर जमिनीवर फवारावे
वांगी पेन्डीमिथॉलीन 2.5 लि 1 हजार लावणीनंतर
अलॅक्लोर 2 लि 1 हजार 2 – 3 दिवसांनी
मिश्र पिके
ज्वारी + तुर मेटॅलॅक्लोर 2 लि 1 हजार पेरणीनंतर परंतु उगवणीपुर्वी सहा
कापुस मुग/उडीद फलुक्लोरेलीन 2 लि 1 हजार पेरणीपुर्वी फवारावे सहा
ऑक्सीफ्लोअरफेन 425मि.ली 1 हजार उगवणीपुर्वी सहा ओलसर जमिनीवर फवारावे
फळ पिके
केळी ॲट्राझीन 3.0 500ते 700 गरजेनुसार लावणीनंतर परंतु तणे उगवणीपुर्वी
ग्लायफोसेट 2 ते 4 500ते 700 गरजेनुसार तणे उगवणीनंतर, तणे 2 ते 4 पानावर असताना
डायुरॉन 1.25 500ते 700 गरजेनुसार लावणीनंतर परंतु तणे उगवणीपुर्वी
द्राक्षे ॲटाझीन 2 ते 3 500ते 700 गरजेनुसार तणे उगवणीपुर्वी
ग्लायफोसेट 2 ते 4 500ते 700 गरजेनुसार तणे उगवणीनंतर तणे 2 ते 4 पानावर असताना
आंबा ग्लायफोसेट 2 ते 4 500ते 700 गरजेनुसार तणे उगवणीनंतर, तणे 2 ते 4 पानावर असताना
संत्रामोसंबी ॲट्राझीन 2 ते 3 500ते 700 गरजेनुसार तणे उगवणीपुर्वी

महत्‍वाच्‍या सुचना

  • सर्व तणनाशके समप्रमाणात जमिनीवर फवारावीत. * तणनाशकांची मात्रा शिफारश केल्याप्रमाणे वापरावी. ·तणनाशकांचा वापर शिफारशीनुसार दिलेल्या पिकात, दिलेल्या वेळी व दिलेल्या मात्रेत अचुकपणे करावा. ·  उभ्या पिकात तणनाशके फवारतांना हुडचा वापर करावा. ·   फळपिकात तणनाशके वापरतांना विशेष काळजी घ्यावी. 

निरनिराळया पीक पध्दतीतील तण व्यवस्थापन

ज्वार – करडई : ज्वार – करडई पीक पध्दतीत ज्वारीतील तणांचे परिणामकारकरित्या नियंत्रण करण्यासाठी ॲट्राटीन हेक्टरी 1.00 किलो 1000 लिटर पाण्यात मिसळुन पीक ऊगवणीपुर्वी जमिनीवर समप्रमाणात फवारावे. नंतर रब्बी हंगामात कोरडवाहु करडईचे पिकात तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त निदंणी आणि कोळपणी करावी.

कापुस – उन्‍हाळी भुईमुग : कापुस – उन्हाळी भुईमूग या पीक पध्दतीत कापसातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पॅन्डिमिथॅलीन 2.5 लिटर प्रति हेक्टर किंवा डायुरॉन 625 ग्रॅम, 1000 लिटर पाण्यात मिसळुन, ते एक हेक्टर क्षेत्रावर कापुस उगवुन येण्याचे आत जमिनीवर समप्रमाणात फवारावे व सहा आठवडयांनी 1 निंदणी आणि कोळपणी करावी. नंतर घेतलेल्या उन्हाळी भुईमुगास दोन निंदण्या व दोन कोळपण्या 3 व 5 आठवडयांनी कराव्यात.

कापुस – सुर्यफुल : कापुस – सुर्यफूल या पीक पध्दतीस कापसासाठी वरील कापुस – भूईमुग पीक पध्दतीचे उपाय घेवुन नंतर सुर्यफुलासाठी पीक उगवणीनंतर 3 व 6 आठवडयांनी खुरपणी व कोळपणी करावी.

तणनाशके वापरांना पुढील काळजी घ्यावी 

  1. विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी अचुकपणे वापरावीत. तणनाशकाची मात्रा चुकल्यास म्हणजे तणनाशके शिफारशीपेक्षा कमी मात्रा दिल्यास तणांचे नियंत्रण कमी प्रमाणात होते तर अधिक मात्रा वापरल्यास पिकांना इजा होण्याचा धोका असतो.
  2. मुदत संपलेली तणनाशके वापरु नयेत. तणनाशके खरेदी करतांना याची काळजी घ्यावी.
  3. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप किंवा फुटस्रे वापरावा. परंतु ते शक्य नसल्यास तणनाशकाच्या फवारणीनंतर त्याच पंपानी किटकनाशके फवारणी करण्यापुर्वी फवारणी पंप 2 – 3 वेळा साबण स्वच्छ धुवूनच वापरावा.
  4. तणनाशके फवारतांना जमीन ढेकळे रहित भुसभूशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  5. तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसतांना तसेच फवारल्यानंतर 2 – 3 तास स्वच्छ सुर्यप्रकाश राहील व पाऊस न येण्याची शक्यता पाहुनच फवारावी.
  6. भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीमध्ये तणनाशकांची मात्रा कमी प्रमाणात वापरावी. उगवण पश्चात वापरावयाच्या तणनाशकांचा वापर तणांच्या जोरदार वाढीच्या (2-4) अवस्थेत करावा
  7. तणनाशकांची फवारणी करतांना त्यासाठी स्वच्छ व हलक पाणी वापरावे. जड पाण्याचा वापर टाळावा.

भारतामध्ये उपलब्ध अथवा उपयोगातील तणनाशकांची यादी

.क्र. रासायनिक नाव व्यापारी नाव टक्के क्रियाशील घटक तणनाशक उत्पादन करणाया कंपनीचे नाव
1.    2, 4 डी टारगेट, 2, 4 – डी, नॉकवीड, वीडनाश, फर्नोक्झोन, वीडमार 38 ईसी, 34 ईई, 80 % डब्ल्युपी, 72 डब्ल्युएससी बायर, जनिका आई.सी.आई. एग्रोमोर धनुका, रॅलीस, अतुल, भारत फ्लवराईजर्स
2.    अलॅक्लोर लासो 50 ईसी मौनसेन्टो
3.    एनिलोफॉस ॲनिलॉन एनिलोगार्ड, एनिलोघान ट्रॅगार्ड एनिफोस्फार, एरोजिन 30 ई सी बायर, घरडा, धनुका, डयुपॉन्ट, ए. आ. एम. सी. ओ., शावैलेश.
4.    एनिफोलॉस + 2,4-डी.ई.ई वन शॉर्ट 56 ईसी (24:32) बायर
5.    एनिफोलॉस + ईथाक्सील्फयुरॉन राईसगार्ड 26 डब्ल्यु पी (25+1) बायर
6.    ॲट्राझिन अट्रासील, ॲट्राटाफ, धानुजीन, सेालारो 50 डब्ल्यु पी बायर, धनुका, पी. आई. इडंस्टी, रॅलीस
7.    ब्युटाक्लोर तीर क्झिक्लोर, धानुक्लोर, मॉचिटी, ब्युटासान, ट्रॅप, वीडकिल, वीडआऊट, मिरक्लोर, स्टार क्लोर 50 ईसी 5 जी मौनसॅटो, धुनका, रॅलीस, कोरोमण्डल, इंडैग, हिन्दुस्थान इनसेक्टीसाईड, मोन्टारी, सर्ले, सिरीस, सुदर्शन केमिकल्स, ईसाग्रो, बायर
8.    ब्युटाक्लोर + प्रोपानिल ब्युटानिल 28 + 28 ई सी मोनसेन्टो
9.    क्लोरीम्युरॉन ईथाईल क्लोबेन 25 डब्ल्यु पी डयुपॉन्ट
10.   क्लोरीम्युरॉन ईथाईल + मेटसल्फयुरान मिथाईल अल मिक्स 20 डब्ल्यु पी डयुपॉन्ट
11.   क्लोडिनॉकॉप प्रोपार्जिल टॉपिक 15 डब्ल्यु पी सिंजन्टा
12.   क्लोमोजोन कमांड 50 ईसी रैलिस
13.   साईलोफॉप ब्युटाईल क्लिंचर 10 ईसी डी – नौसिल
14.   डेलॅपॉन डेलॉपीन, डाऊपॉन 85 डब्ल्यु पी डी-नोसिल, वी. ए. एस. एफ.
15.   डिक्लोफॉप – मिथाईल इलॉक्स 28 ईसी बायर
16.   डायुरॉन एगोमेक्स, कारमेक्स,

क्लास

80 डब्ल्युपी एवेन्टिस,साईनामिड,रोनपुलेन्क,अतुल,

एग्रोमोर

17.   ईथाक्सीसफयुरॉन सनराईज 15 डब्ल्यु डी जी बायर
18.   फेनॉक्साप्राप-पी ईथाईल पुमासुपर, व्हिप सुपर 10 ईसी, 5 ईसी बायर
19.   ग्लुफोसिनेट अमोनियम बास्ता, लिबर्टी 15 एस एल बायर
20.   ग्लायफॉसेट ग्लायमॅक्स ग्लोईसेल, ग्लोईटाफ, विनाश, वीडब्लॉक कोमेट 41 एस एल मोनसेन्टो एक्सेल, रॅलिस, धनुका, पी. आर.     इन्ट्रस्टी
21.   इमेजेथेपार परसुट 10 एस एल बी. ए. एस. एफ.
22.   इमेजेथेपायर + पेन्डीमिथेलीन वैलौर (क्लोर) 32 ईसी (2+32) बी. ए. एस. एफ.
23.   आईसोप्रोटयुरान रोनक, स्टार, टोलकन, नोसीलॉन

डेलरॉन, धानुलॉन, धर, ग्रेमीनॉन

ग्रेनीरॉन, हिलप्रोटयुरॉन, आइसोसिन आईसोगार्ड, आईसोहिट, आईसोलॉन

आइसोटॉक्स, जयप्रोडयुरॉन, कनक,

मर्करॉन, मिररॉन, मोनोलॉन, नोसिलॉन, नोरलॉन, पेस्टोलॉन, फलुन, रक्षक, शिवरॉन, सोनारॉन, सुलरॉन, टाऊरस, टोटालॉन, ट्रिटीलॉन, वन्डर

50 डब्‍ल्‍यु पी

75 डब्‍ल्‍यु पी

बायर, घरडा, डक्ष-नोसील, रॅलीस, धनुका

मोन्टारी, आई,एसएफसीओ

हेक्सामार, डी नोसील

24.   लिनुरॉन एकालॉन 50 डब्‍ल्‍यु पी बायर
25.   मेथाबेन्ज्‍थायोजुरॉन एम्बोनिल, फर्च, टिबुनिल, यील्ड 70 डब्‍ल्‍यु पी बायर
26.   मेटोलॅक्लोर डुअल 50 ईसी सिनजेन्टा
27.   मेट्रिब्युजिन वैरियर, लॅक्सॉन, सेंकार, टाटामेन्ट्री 70 डब्‍ल्‍यु पी बायर, रॅलीस, धनुका
28.   मेटसल्फयुरान मिथाईल अलग्रिप, क्रीमीट, डॉट 20 डब्‍ल्‍यु पी डयुपॉन्ट
29.   मेटसल्फयुरान मिथाईल + क्लोरिम्युरॉन- ईथाईल 20 डब्‍ल्‍यु पी

(10+10)

डयुपॉन्‍ट
30.   पेन्डिमिथॅलीन स्टॉम्प, टाटा पनिडा, वीडॉक 30 टक्के ई सी
31.   पॅराक्वाट डायक्लोराईड ग्रामोक्झोन, युनीक्लाट 24 टक्के ई सी

संदर्भ

वनामकृविची कृषी दैनंदिनी 2016 – पान नं. 131 ते 138.