हवामान अंदाज व कृषि सल्ला (दि 03 ते 07 फेब्रवारी ,२०२१)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी 5 % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25 %  इसी 20 मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%  4.5 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व  पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायमेथोट 30 % 13 मीली किंवा असिफेट 75 %  10 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात उपलब्धतेनुसार व  पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हंगामी ऊस पिकाची लागवड करावी.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबे बहार संत्रा मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावेसंत्रा मोसंबी फळ बागेत खोडांना बोर्डोमिश्रण लावावे.काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा मोसंबी फळांची काढणी करावी.फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे.चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

 भाजीपाला पिके

भाजीपाला पिकात (मिरचीवांगीभेंडीरसशोषन करणाया किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकात भुरी रोगाचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  मायक्लोब्युटनिल 10% डब्लूपी  10 ग्राम  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चारा पिके

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या चारा पिकात पाणी व्यवस्थापन करावे.

 

 

पशुधन

नैसर्गिक तसेच लागवडीसाठी तयार केलेल्या गवताच्या सुधारित जातीपासुन मूरघास बनवत असताना ते 3.5 % या प्रमाणात ऊसाच्या मळीचा वापर करावामूरघास तयार करण्यासाठी योग्य्‍ पिकाची कापणी पिक फुलोयात असताना तसेच एकदल तृणधान्य्‍ चारा पिकाच्या कणसातील दान्यामध्ये दुध भरण्याच्या अवस्थेत करावी.

सामुदायिक विज्ञान

बालसंगोपन हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. त्यामुळे नवविवाहीत दाम्पत्यांनी पूर्व तयारीनिशी पालकत्वाची जबाबदारी स्विकारावी. अशी तयारी करत असतांना ते शारीरिक,मानसिक व आर्थिकदृष्टया सक्षम असावे.तसेच त्यांना बाल संगोपनाविषयी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

कृषी हवामान सल्ला पत्रक क्रमांक  – ८8/२०२०-२१    दिनांक – 02.02.2021