कृषी हवामान सल्ला : ३ एप्रिल २२ पर्यन्त

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 एप्रिल ते 09 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता गहू पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी  भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी  सोयाबीन पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता बागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी.काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल व फुल गळ/फळ गळ होणार नाही. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत झाडावर पाण्याचा फवारा घ्यावा. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

फळबाग

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

टरबूज/ खरबूज

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता टरबूज/खरबूज पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. पिकाचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. भाजीपाला पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

फुलशेती

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. फुल पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

कुक्कुट पालन

कोंबडयांच्या शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंन्टीलेटर्स (रुंद खिडक्यांची व्यवस्था करावी तसेच त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शेडच्या छतावर गवताचे किंवा पोत्यांचे आच्छादन करावे व अधून मधून त्यावर पाणी शिंपडावे म्हणजे शेडच्या आतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी. पक्ष्यांना सकाळी किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे. शेडमध्ये पक्ष्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी  शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करतांना भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. उन्हात (विशेषत: दूपारी 12 ते 3) बाहेर जाणे टाळावे.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी