टोमॅटो पीकावर प्रामुख्याने बुरशी, विषाणू व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याआधीच जर रोगांचे व्यवस्थापन केल्यास आर्थिक नुकसान निश्चितच कमी होऊन उत्पादनात भर पडते. त्यामुळे टोमॅटो पिकावर आढळून येणारे रोग व त्यांचे व्यवस्थापन विषयक माहिती असणे गरजेचे असते.
1) रोप कोलमडणे किंवा रोपांची मर (डँपिंग ऑफ) रोगाचे कारण :
हा रोग जमिनीत वाढणार्या पिथियम, रायझोक्टोनिया किंवा फायटोप्थ्रोरा या बुरशीमुळे होतो. रोगाची लक्षणे : गादी वाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. रोगग्रस्त रोपे निस्तेज आणि मलूल होऊन मरतात. रोपांचा जमिनीलगतचा खोडाचा भाग व मुळे सडतात. त्यामुळे वाफ्यातील रोपे जमिनीलगत कुजतात आणि कोलमडून सुकून जातात.
रोगाचे व्यवस्थापन :
अ) भारी जमिनीत रोपवाटीका करु नये. रोपवाटिकेची जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
ब) जमीन उन्हाळ्यात योग्य प्रकारे नांगरून व तापवून घ्यावी. क) रोपांचे वाफे लागवडीपूर्वी फॉरमॅलिन रसायनद्रव्याने निर्जंतुक
करावेत.
ड) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम/ कॅप्टन
अधिक 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून बीजप्रक्रिया करावी. प्रतिगादीवाफा 25 ते 30 ग्रॅम कॉपर ऑक्झिरक्लोडराईड 50% डब्ल्यू.पी पावडर मिसळावी. बियाणे लागवडीपासून 12 व्या व 20 व्या दिवशी वाफ्यावर कॉपर ऑक्झि क्लोकराईड 50% डब्ल्यू.पी 30 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
इ) रोपांना गरजे पुरते परंतु नियमित पाणी द्यावे. बियाणे दाट पेरू नये.
2) भुरी (पावडरी मिल्ड्यू )
रोगाचे कारण : हा रोग लव्हेलुला टावरिका या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूला पांढरट पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावर आणि फुलांवर दिसून येते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण मंदावते. या रोगाचा प्रसार हवेद्वारे व रोगट पालापाचोळ्यातून होतो. रोगाचे व्यवस्थापन :
अ) रोगट पालापाचोळ्यावर रोगाची बुरशी असते म्हणून असे अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
ब) रोगाची लक्षणे दिसताच गंधक 80% डब्ल्यू.पी 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यू. पी. 10 ग्रॅम किंवा प्रोपीकोण्याझोल 25 % ईसी 5 मि.लि. 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात.
3) लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाईट)
रोगाचे कारण : हा रोग अल्टरनेरिया सोलानी या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : जमिनीलगतच्या पानांपासून या रोगाची सुरुवात होते आणि पाने पिवळी पडतात नंतर पानावर तपकिरी काळपट गोलाकार ठिपके दिसू लागतात. या ठिपक्यांवर एकात एक
अशी वर्तुळे दिसतात. पाने करपून गळून पडतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास फांदीवर आणि फळांवर ठिपके आढळून येतात आणि सर्व झाड करपते.
फळधारणेच्या सुरुवातीच्या काळात हा रोग जास्त दिसून येतो. दमट व उष्ण हवेत या रोगाचा प्रसार झपाट्याने
होतो. जमिनीसह सदोष बियाण्यांतून होणार्या या रोगाचा प्रादूर्भाव हवा व पाण्यामार्फतही होतो.
रोगाचे व्यवस्थापन :
अ) रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.
ब) टोमॅटोनंतर बटाटा, मिरची, वांगी किंवा पुन्हा टोमॅटो घेऊ
नयेत (पिकाची योग्य फेरपालट करावी).
क) रोगट झाडे उपटून जाळून नष्ट करावेत.
ड) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा
कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
इ) पीक 25 ते 30 दिवसाचे झाल्यावर त्यावर कॉपर ऑक्झिाक्लोमराईड 50% डब्ल्यू. पी 25 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75 डब्ल्यू. पी. 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यू. पी. 10 ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9% ई सी 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15
दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 3 ते 4 वेळा आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात.
4) मर रोग
रोगाचे कारण : हा रोग जमिनीतील फ़्युजेरियम या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : मर रोगमध्ये खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते. कोमेजलेल्या झाडांचा रंगही उडतो. ढगाळ वातावरण किंवा जास्त आर्द्रता असेल अशा वेळी मर झालेल्या झाडांच्या खोडांवर बुरशीचा गुलाबी थर दिसतो. रोगग्रस्त झाडाचे दोन उभे भाग केले असता आतील गाभा तपकिरी रंगाचा दिसतो.
रोगाचे व्यवस्थापन :
अ) जमीन मध्यम प्रतिची, उत्तम निचर्याची असावी.
ब) हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होत असल्याने पिकांची फेरपालट करावी म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. जमिनीची खोल नांगरट करून पूर्वीच्या पिकांची धसकटे गोळा करून नष्ट करावीत. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत यांचा किंवा हिरवळीच्या खताचा भरपूर प्रमाणात वापर करावा.
क) रोपवाटिकेतील वाफ्यास पेरणीपूर्वी 15-20 दिवस आधी फोरमॅलीनची प्रक्रिया करावी. यासाठी 250 ते 400 मि.लि. फॉरमल्डीहाईड सात ते आठ लिटर पाण्यात मिसळून प्रति चौ.मी. क्षेत्र या प्रमाणात वापरावे आणि प्लॅस्टिक पेपरने 48 तास चांगले झाकून ठेवावे. पेरणीपूर्वी गादी वाफ्यास भरपूर पाणी द्यावे आणि वाफशावर पेरणी करावी. लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टवरी पाच किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून टाकावी; तसेच रोपांची मुळे ट्रायकोडर्मा द्रावणात बुडवून लागवड करावी.
ड) रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्झितक्लोुराईड 50% डब्ल्यू.पी. किंवा कॅप्टन 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यू. पी. 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
5) टोमॅटो स्पोटेड विल्ट
रोगाचे कारण : हा रोग ग्राऊंटनट बड नेक्रॉसीस (टॉस्पोव्हायरस) या विषाणूमुळे होतो. या विषाणूचा प्रसार फुलकिडी या किडीमार्फत होतो.
रोगाची लक्षणे : रोगाची सुरवात प्रथम शेंड्याकडून होते. शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. हा रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस-काळपट चट्टे पडतात. शेवटी झाड करपते व मरते. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीपासून एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न होता संपूर्ण झाड 10 ते 15 दिवसांत करपून मरून जाते. उशिरा रोग आल्यास फळाचे काही तोडे होतात.
या रोगाचा प्रादुर्भाव फळांवरसुद्धा होतो. फळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात. फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही.
6) लीफ कर्ल / पर्णगुच्छ (बोकड्या)
रोगाचे कारण : हा रोग टोबॅको लिफकर्ल व्हायरस या विषाणूमुळे होतो. या विषाणूचा प्रसार पांढरी माशी या किडीमार्फात होतो. रोगाची लक्षणे : या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी व शेंडे उभट दिसतात. पानांवर पिवळसर झाक दिसते. यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाड खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकडल्यासारखे दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास झाडांवर फळे धरत नाही किंवा आकाराने लहान राहतात. या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही.
7) टोमॅटो मोझॅक
रोगाचे कारण : हा रोग टोबॅको मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो. रोगाची लक्षणे : या रोगामुळे पाने बारीक, फिक्कट हिरवी होऊन मलूल दिसतात. पानांवर हिरवट, पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले – फळे फार कमी प्रमाणात लागतात. फळाच्या आतील भागात काळसर तपकिरी भाग दिसून येतो. त्यामुळे टोमॅटो खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रोगग्रस्त बियाण्यापासून तयार झालेल्या रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरवात होते. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करतेवेळी, स्पर्शाने आणि मावा व किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
विषाणू रोगांचे व्यवस्थापन :
विषाणू रोगाचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे, मावा या रसशोषण करणार्या किडींद्वारे होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाची लागण रोपावाटीकेपासून पिकाच्या वाढी पर्यंत केव्हाही होते. प्रादुर्भाव झाल्यावर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपावाटीकेपासून काळजी घेणे फार जरुरचे आहे.
अ) रोगट झाडे दिसल्याबरोबर उपटून नष्ट करावेत. ब) निरोगी बियाणांचा वापर करावा.
क) शेतातील व शेताभोवतीची तणे नष्ट करावीत.
ड) पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट 25 ग्रॅम प्रति 3 ु 1 मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
इ) रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर
40 मेश नायलॉन नेट 2 मीटर उंची पर्यत मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणार्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
ई) शेतात टोमॅटोची रोपे लावण्यापूर्वी इमिडाक्लोप्रीड (17.8
% ईसी) 4 मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (50 % डब्ल्यू.पी.) 10 प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्यात रोपे बुडवून नंतरच रोपांची शेतात लागवड करावी. लागवडीकारिता चंदेरी (सिल्व्हर) मल्चिंग फिल्मचे आच्छादन वापरावे.
उ) सुरुवातीपासून रोग पसरविणा-या किडींच्या बंदोबस्त केल्यास ह्या रोगांचा प्रसार होत नाही. त्यासाठी लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने साअँण्ट्रानिलीप्रोल 10.26 टक्के ओ.डी. 12 मि.लि. किंवा डायमेथोएट 30 % ईसी 20 मि.लि किंवा थायामिथॉक्झाम 25 % डब्ल्यू.जी. 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार बदलून फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क 5 % ची फवारणी दोन फवारण्यांच्या मध्ये घ्यावी.
ऊ) पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा (प्रत्येकी 12 प्रतिहेक्टर) उपयोगसुद्धा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो. रसशोषक किडींना मुख्य पिकांवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी टोमॅटो पीक क्षेत्राभोवती पीक लागवडीपूर्वी 7 ते 15 दिवस अगोदर ज्वारी किंवा मका पिकांच्या 2 ते 3 ओळी सभोवती लावाव्यात.