प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराटया जमा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. रब्बी ज्वारी पिक फुलोरा ते दाने भरणे अवस्थेत असताना उपलब्धतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी डायमेथोएट 30% ईसी 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या नियंत्रणासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत फळाची प्रत चांगली राहण्यासाठी केळीच्या घडाणा झाकून घ्यावे. बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्षे बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्षे बागेत भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.
फुलशेती व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला पिके
टोमॅटो पिकावरील फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5% एससी 10 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम उद्योग
तुतीबागेत केसाळ अळी (बिहार हेअरी केंटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळयात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळया अंडयातुन फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिवीका करतात यामुळे पानांची चळणी झालेली दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतीक पध्दतीने म्हणजे हाताने प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळया रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.
सामुदायिक विज्ञान
प्रत्येक बालक हे त्यांच्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची अनमोल संपत्ती आहे. त्यामुळे त्यांची काटेकोरपणे काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी