प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 07 मे रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे, तसेच उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 08 मे रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे. दिनांक 09,10 व 11 मे रोजी लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 12 मे ते 18 मे, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पीक व्यवस्थापन
सध्याच्या काळात उन्हाळी भुईमूग काढणी सुरू आहे, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे,काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. उशिरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास इमिडाक्लोप्रीड 17.8 % 02 मिली किंवा थायमिथोकझाम 12.6 % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5 % 03 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्याच्या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.
फळबागेचे व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान केळीच्या झाडांना काठीचा आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकर करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे. द्राक्षे बागेमध्ये एप्रिल छाटणी हि घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्षे बागेत एप्रिल छाटनी 15 मे पूर्वी करून घ्यावी.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.
भाजीपाला पिके
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भोपळावर्गीय भाजीपाला पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मिथाईल युजेनाल हे अमिष असलेले सापळे लावावेत तसेच सायनॅन्ट्रानिलीप्रोल 10.26 % 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
पुर्वी ज्या शेतामध्ये मिरची, हळद, तंबाखू किंवा भाजीपाला पिके असतील त्याशेतात जास्त प्रमाणात खत मात्रा असल्याने किंवा रासायनिक किटकनाशक/ बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारणी केली असेल अशा जमिनीची निवड तुती लागवडीसाठी करणे टाळावे. उन्हाळयात संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मयारदित (22 ते 28 सें. ग्रे.) ठेवणे शक्य झल्यास कोष उत्पादन येते पण 350 से. ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम कीटक पाने खात नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
पळसाच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 10 %, 2% आणि 4 % या प्रमाणात घेऊन वापरता येतो. पळसाच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10 % हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका पिवळा ते गडद केशरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सुर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.
(सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)