हवामान अंदाज व कृषि सल्ला (दि 10 ते 14 फेब्रुवारी 2021)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. आजपासून पुढील चार ते पाच दिवसात हळूहळू किमान तापमानात 2 ते अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी 5 % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25 %  इसी 20 मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%  4.5 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात उपलब्धतेनुसार व  पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायमेथोट 30 % 13 मीली किंवा असिफेट 75 %  10 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

फुलोरा अवस्थेत असलेल्या आंबे बहार संत्रा मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार मोसंबी बागेत 400:400:400 ग्राम प्रती झाड नत्र, स्फुरद व पालाश व आंबे बहार संत्रा बागेत 500:500:500 ग्राम प्रती झाड नत्र, स्फुरद व पालाश खताची मात्रा देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे. बागेत सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत असलेल्या आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला पिके

भाजीपाला पिकात (मिरचीवांगीभेंडीरसशोषन करणाया किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  टोमॅटोवरील रसशोषण करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी सायांट्रानिलीप्रोल 10.26% 18 मिली  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.

पशुधन

सध्या किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या,मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदाण्याचे  पडदे लावावे, त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक बल्ब लावावे.

चारा पिके

काढणीस तयार असलेल्या चारा पिकांची काढणी करून घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

फळे भाज्या प्रक्रिया करून वाळवल्यास त्यांचा रंग, गंध आणि चव टिकून राहते. बाजारात फळे भाज्यांचे भाव कमी झल्यानंतर निर्जलीकरन करून मुल्यवर्धनातून चांगला फायदा मिळवता येतो.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरेमुख्य प्रकल्प समन्वयकग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी