कृषी हवामान सल्ला; २ ते ८ एप्रिल २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ  तर उस्मानाबाद जिल्हयात आकाश  स्वच्छ  ते अंशत ढगाळ राहील. मराठवाडयात कमाल तापमानात किंचीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानूसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 02 ते 08 एप्रिल  दरम्यान कमाल तापमान 34.0 ते 38.0 अं.से., 9 ते 15 एप्रिल दरम्यान कमाल तापमान 36.0 ते 38.0  अं.से., 16 ते 22 एप्रिल दरम्यान 36.0 ते 38.0 अं.से. तसेच 23 ते 29 एप्रिल 2021 दरम्यान कमाल तापमान 36.0 ते 39.0 अं.से. राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी भुईमूग पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकास सकाळी किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास  इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के 02 मिली किंवा  थायमिथोकझाम 12.6 टक्के +  लॅम्बडा  सायहॅलोथ्रिन  9.5 % 03 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हात फवारणी करू नये.काढणी केलेल्या रब्बी ज्वारी  पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.काढणी केलेल्या गहू पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे केळी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उन्‍हाळयामध्‍ये घडाच्‍या दांडयावर व केळीवर प्रखर सुर्यप्रकाश पडल्‍यास दांडा काळा पडून सडतो. केळी पिवळी व काळी होतात. उष्‍णतेपासून संरक्षणासाठी दांडयावर व घडावर वाळलेल्‍या पानांची पेंढी ठेवावी. ज्‍यामुळे सनस्‍ट्रोक होणार नाही. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही.कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही.द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे  नवीन लागवड केलेल्या सिताफळ बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही.

 भाजीपाला पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.   भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हात फवारणी करू नये.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.   फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादनासाठी तुती पानांचा वाटा 38 % असून किटक संगोपन गृहातील तापमान व आद्रतेचा वाटा 37 % असतो तर एकूण कोष उत्पादनाच्या खर्चापैकी 60 %खर्च हा तुती पाने उत्पादनासाठी होतो. उर्वरीत खर्च  कीटक संगोपन आणि कोकाढणी व बाजारपेठ यासाठी होतो.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

( सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )