कृषि हवामान सल्ला; दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 16 फेब्रूवारी 2021 रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 फेब्रूवारी 2021 रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, तसेच परभणी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड व बिड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 फेब्रूवारी 2021 रोजी  औरंगाबाद व जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता आहे, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, बिड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 फेब्रूवारी 2021 रोजी औरंगाबाद, जालना व बिड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्‍बी ज्‍वारी, हरभरा आणि ऑक्‍टोबरमध्‍ये लागवड केलेला गहु या पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ही पिके काढणी केली असल्‍यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची  सुरक्षित ठिकाणी साठवण करावीसध्‍याच्‍या काळात वेळेवर लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या द्राक्षांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जुन मध्‍ये लागवड केलेल्‍या  केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्‍हणुन झाडास आधार दयावा.

भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठयाच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

सामुदायिक विज्ञान

एका प्रौढ पुरूषाने 3 लीटर व एका प्रौढ महिलाने 2 लीटर पाणी रोज पीले पाहिजे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी