प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 जून ते 03 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये. कापूस पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी.पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तुर पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच तुर पिकाची पेरणी करावी.पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मुग/उडीद पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच मुग/उडीद पिकाची पेरणी करावी.पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. भुईमूग पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच भईमूग पिकाची पेरणी करावी.पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मका पिकाची पेरणी जुलै अखेर पर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच मका पिकाची पेरणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या केळी बागेत 50 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे. आंबा फळबागेत 500:500:500ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी.द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत.बागेत पानांची विरळणी करावी.सिताफळ फळबागेत तणनियंत्रण करावे.
भाजीपाला पिके
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकाची लागवड करावी. गादी वाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना आवश्यकतेनूसार झाऱ्याने पाणी घालावे.
फुलशेती व्यवस्थापन
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची लागवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुधनात (गाय, म्हैस) यांना लसीकरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1. लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. 2. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे (एकत्रित किंवा स्वतंत्र) पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करावे. 3. ब्रुसेललोसीस कॉटन प्रजाती 19 (3 ते 4 महिने) वयोगटातील वासरांसाठी. 4. फाशी रोग होत असलेल्या विभागात फाशी रोगाची लस 2 ते 3 किलोमिटर परिसरातील पशुधनास चक्राकार पध्दतीने करावे.
सामुदासिक विज्ञान
कोरोना विषाणू उद्रेकात मानसिक स्वास्थ्याच्या जपणूकीसाठी युवकांनी स्वास्थ्यवर्धक जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. याकरिता त्यांनी व्यायाम, प्राणायाम, ध्यान पोषक आहार व पुरेशी झोप या बाबी आमलात आणून विधायक कार्यात वेळ व्यतीत करावा. तसेच अधिक मानसिक तणाव जाणवत असेल तर मानसोपचार तज्ञ्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी