कृषी सल्ला : मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता; पेरणीसाठी घाई नको

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  दिनांक 05 जूलै रोजी मराठवाडयातील सर्व  जिल्हयात तसेच दिनांक 06 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 जूलै ते 13 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी.ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करुन तण व्यवस्थापन करावे.नवीन लागवड केलेल्या हळद पिकात आंतरमशागतीची कामे करुन तण व्यवस्थापन करावे

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे. नविन लागवड केलेल्या बागेत आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.‍ लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे. नविन लागवड केलेल्या बागेत आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.‍चिकू बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

नविन लागवड केलेल्या भाजीपाल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.‍

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुलपिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. फुलपिकात आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.‍

चारा पिके

वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे.  पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी.

तुती रेशीम उद्योग

शेंद्रिय पध्दतीने रेशीम कोष उत्पादनासाठी कंम्पोस्ट खत 20 टन प्रति हेक्टर म्हणजे 8 टन प्रति एकर प्रमाणे वर्षात दोन वेळा जुन व नोव्हेंबर महिन्यात द्यावे आणि गांडूळ खत 5 टन प्रति हेक्टर प्रमाणे म्हणजे एकरी दोन टन जुन व नोव्हेंबर महिन्यात वर्षात दोन  समान हप्त्यात द्यावे. वरील प्रमाणे खत दिल्यानंतर, दुसऱ्या वर्षापासून 140 किलो अमोनियम सल्फेट 70 किलो सींगल सुपर फॉस्फेट व 19 किलो पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक प्रमाणे द्यावे.

सामुदायिक विज्ञान

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेच अंघोळ घालणे त्याच्या स्वास्थासाठी धोकादायी असल्याने कुटुंबियांनी त्याला सुरुवातीच्या 6 तासात अंघोळ घालने पूर्णत: टाळून पुढील 24 तासानंतर डॉक्टरी सल्ल्यानूसार अंघोळ घालावी.

सौजन्‍य, डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी