कृषि हवामान सल्ला; २७ एप्रिल ते २ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 27 एप्रिल रोजी बिड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, हलक्या पावसाची  तसेच तुरळक ‍ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 28 व 29 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 30 एप्रिल रोजी  नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 01 मे रोजी  बिड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 मे ते 08 मे, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्‍याच्‍या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा.

भाजीपाला पिके

उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाण्‍याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्‍यावी. काढणीस तयार असलेल्या कांदा ‍पिकाची काढणी करावी.

भाजीपाला

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठयाच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

सामुदायिक विज्ञान

पिवळया रंगाच्या भाज्या व फळे जसे केळी, खरबूज व अंबा ही ऱ्हदय, डोळे आणि पचन संस्थेच्या उत्तम कार्याकरीता व प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. लाल रंगाची भाज्या व फळे जसे टोमॅटो, सफरचंद, टरबूज, स्ट्रॉबेरी व लाल सिमल मिरची यांचा आहारात समावेशकेल्यामुळे रक्त शुध्द होते व कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)