कृषी सल्ला : पेरणीयोग्य पावसानंतरच करा पेरणी

मराठवाड्यात पूढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (30-40 किमी/तास) राहून पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पूढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात  दिनांक 22 ते 26 जून दरम्यान बहूतांश ठिकाणी बाष्पोत्सर्जनाचा वेग 4.1 ते 6.4 मिमी दिसून येत आहे म्हणून पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (औरंगाबाद जिल्हा : सोयगाव  ; जालना जिल्हा : भोकरदण, बदनापूर, जाफराबाद ; उस्मानाबाद जिल्हा : वाशी) जमिनीतील ओलावा बधून वापसा आल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 जूलै ते 10 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. कापूस पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी.वेळेवर पेरणी केलेल्या तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. तुर पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या मुग/उडीद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. मुग/उडीद पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच मुग/उडीद पिकाची पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. भूईमूग पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच  भूईमूग पिकाची पेरणी करावी.पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच  मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जुलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन लागवड केलेल्या  केळी बागेत तणांचे  व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या  आंबा बागेत तणांचे  व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत, शेंडा खुडावा तसेच बागेत पानांची विरळणी करावी.सिताफळ फळबागेत तणनियंत्रण करावे.

भाजीपाला

गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची लागवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयाच्या सुरूवातीला दुधाळ गाई, म्हशींचे पोषण पुर्णपणे कोवळे हिरवे गवत किंवा तृणधान्य चारापिके यावर करू नये जेणेकरून “मॅग्नेशियम टिटॅनी” चा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो.

सामुदासिक विज्ञान

कपडयावरील मेहंदीचे कोरडे डाग काढण्यासाठी घरगुती स्तरावर द्रावक आणि विरंजक प्रमाणित केले आहे. डाग काढण्याची पध्दती : मेहंदीच्या डागाचे कापड गरम दुधात 2 मिनीट ठेवून थोड्यावेळाने दोन्ही हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हात वाळवा.

सौजन्‍य – डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी